टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील दि 21 शुक्रवारी रोजी संध्याकाळी जामा मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचा आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत हिंदू मुस्लिम धर्मांचे लोक या ठिकाणी एक जातीय सलोखा निर्माण करण्यात आले होते त्या वेळी आमदार संतोष दानवे यांनी मुस्लिम समाजांना पवित्र महिन्याच्या व ईद मुबारक शुभेच्छा दिल्या असून त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आ संतोष दानवे, भाजपचे पदाधिकारी, गोविंदराव पंडित, दत्तू पंडित, उद्धव दूनगहु, रामु शिंदे, परशुराम रजाळे, गंगाधर खरात , बाबासाहेब पुंगळे, विठ्ठल हिवाळे, मारोती पुंगळे , शेषराव हिवाळे, राजेंद्र अंभोरे, रामेश्वर घोडके भाजप कार्यकर्ते आदीची उपस्थित होती.