आष्टी । प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील ग्रामपंचायती व सोसायटया वर 90% भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असल्याने आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वच्या सर्व 18 जागा भारतीय जनता पार्टी प्रणित जय श्रीराम शेतकरी विकास पॅनल मोठ्या मताधिक्यांने स्वबळावर जिंकेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला ते भाजपा प्रणित जय श्रीराम शेतकरी विकास पॅनलच्या मतदार मेळाव्यामध्ये आष्टी ता परतूर येथे बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की महाविकास आघाडी पुरस्कार पॅनल कडे मतदारांना सांगण्यासारखी काहीही नसून आपण मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या बळावर ही निवडणूक निश्चितपणाने जिंकणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांनी सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासंदर्भामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले असून आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रणित जय श्रीराम शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित मतदारांना केले
मतदार संघाच्या विकासामध्ये कुठेही कमतरता पडू देणार नाही असे सांगतानाच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की पुरवणी अर्थसंकल्पामध्ये पन्नास कोटी रुपयांचा निधी तर अर्थसंकल्पात, माध्यमातून 120 कोटी रुपयांचा निधी, तसेच रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून तीस कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला असल्याचे सांगतानाच लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरू होतील असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की गेले तीस वर्षे राजकारण करत असताना आष्टी येथील खंडेश्वर मंदिराच्या साक्षीने अनेक निवडणुका मी लढलो असून या ठिकाणाहून लढलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मला यश मिळाले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले, आज खंडेश्वरा समोर जय श्रीराम शेतकरी विकास पॅनल च्या प्रचाराचा नारळ फोडला असून, आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या बळावर जय श्रीराम शेतकरी विकास पॅनल बाजी मारेल असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
शेतकर्यांना उत्कृष्ट व दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी निश्चित पणाने प्रयत्न करणार असून भाजीपाला साठवणूक, कडधान्य आदींसाठी शीतगृह उभारणीचे काम आपण हाती घेणार असून व्यापार्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला माणूस असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले
म्हणून जय श्रीराम शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे रहा असे आवाहन यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित मतदारांना केले
यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर यांनी बोलताना सांगितले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने विजय आपलाच असून महाविकास गाडी समोर कुठलाही पर्याय नसून त्यांना मतदारांना सांगण्यासारखे एकही काम त्यांनी केलेले नसून या उलट माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदार संघाचा समतोल विकास करीत असताना 4700 कोटी रुपयांची विकास कामे, आष्टी व परिसरातील सोळा गावांचा राष्ट्रीय रुरबन मध्ये समावेश करून या गावाला 385 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून
या माध्यमातून अनेक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून दिल्या , कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी निश्चितपणाने येणार्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणारा असून जय श्रीराम शेतकरी विकास पॅनल ला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी श्री राहुल लोणीकर यांनी केले
यावेळी कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर रंगनाथ येवले, अशोकराव बरकुले सुदाम प्रधान, अर्जुन राठोड सुरेश सोळंके, माजी सभापती सिद्धेश्वर सोळंके, संपत टकले शत्रुघ्न कणसे, ज्ञानेश्वर सोळंके गजानन लोणीकर, राजेंद्र बाहेती, बालाप्रसाद सारडा बाळाभाऊ मीठे सुमंत पाटील, सिताराम राठोड अजय चव्हाण सिद्धेश्वर केकान, कृष्णा टेकाळे, बाळासाहेब लहाने उद्धव गुंजाळ, रवींद्र सोळंके यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने मतदारांची उपस्थिती होती.