जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी दि.२२ एप्रिल २०२३ रोजी मंगळबाजार येथील मसूद कुरेशी यांच्या निवास्थानी जाऊन कुरेशी परिवार व यांच्यासह जमलेल्या सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व मुस्लीम बांधवासोबत दिलखुलास चर्चा केली. मंगळबाजार परिसरातील कुरेशी यांच्या घरी मागील एकेचाळीस वर्षापासून दरवर्षी न चुकता ना.दानवे हे रमजान ईद आपल्या बालपणीच्या मित्रासोबत साजरी करतात.
बालपासूनच्या मैत्रीचा धागा दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी अधिकच घट्ट विनला जातोय, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे व शालेय जीवनातील मित्र मसूद कुरेशी यांचा पन्नास वर्षाचा संबंध असून आपण यापुढे ही कायम जोपासणार असून, “रमजान ईद”च्या निमित्ताने अनेक हिंदू आणि इतर धर्मीय बांधवांच्या रमजानशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की धर्म कोणताही असो त्यातील प्रत्येक सणाचा हाच संदेश आहे की माणुसकी, प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. हा प्रेमाचा, माणुसकीचा धागा अजून मजबूत व्हावा असे हि ना.दानवे यांनी बोलतांना सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे, महेशराव आकात, बन्सीधर आटोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, लक्ष्मण राजपूत, अर्जुन गेही, यांच्यासह कुरेशी परिवारातील जावेद भाई, वसीम भाई, सलीम कुरेशी, मसूद कुरेशी, अजहर कुरेशी, मोसिन कुरेशी, मोबीन कुरेशी, शफिक कुरेशी, बरकत कुरेशी, आदींसह असंख्य मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती