डावरगव देवी येथे वीज पडून गायीचा मृत्यू

19
टेंभुर्णी |प्रतिनिधी- जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील शेतकरी विष्णु सखाराम नवले यांच्या शेतात आज 5.30 वजेच्या सुमारास वीज पडून गायीचा मृत्यू झाला आहे. यावेळी पशु वैधकिय अधिकारी वानखेडे यांना मृत्यू झालेल्या गाईचा पंचनामा करण्यासाठी माजी सरपंच अनिल नवले यांनी बऱ्याच वेळा फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु या महाशयांनी कुठल्याही प्रकारचे सौजन्य न दाखवता कॉल रिसिव्ह केला नाही. व तलाठी देखील नॉट रीचेबल होते.यामुळे सदरील शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिक यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे .