देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी  सक्षम-2023; संरक्षण क्षमता महोत्सव एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम

18
जालना | प्रतिनिधी – ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण साठी संरक्षण क्षमता महोत्सव निमित्त आज मधुबन हॉटेल येथे पत्रकार परिषद घेत हिंदुस्थान पेट्रोलिइमचे यशउत्कर्ष त्रिपाठी आणि दया हंबीर यांनी  सक्षम 2023 संरक्षण क्षमता महोत्सवाबद्दल माहिती दिली. यावेळी ते माहीती देतांना म्हणाले की,  सक्षम – 2023 (संरक्षण क्षमता महोत्सव) हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे   जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य आहे.  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने / समर्थनासह विविध उपक्रम हाती घेतात. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना संशोधन संघटना   (PCRA)  पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनाचे जनजागृती करण्यासाठी, इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनाचे धोरण आणि रणनीतीचा प्रस्ताव ठेऊन, सरकारला मदत करण्यासाठी अग्रणीय आहे. असे त्यांनी यावेळी सांगीतले  तसेच 24 एप्रिल 2023 ते 08 मे 2023 या कालावधीत ऊर्जा संरक्षण ‘नेट झिरो’कडे   (Energy Conservation towards ‘Net Zero’)    च्या दिशेने ऊर्जा संरक्षण या टॅगलाइनसह सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.  * याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील तेल उद्योगाने 24 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता   रवींद्र चव्हाण, मंत्री  PWD,  अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या शुभ उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे.  कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे तेल कंपन्यांनी आयोजित केलेल्या रांगोळी आणि तेल संवर्धन वर लघु नाटिका ची पाहणी करतील ज्यामधे शालेय विध्यार्थी सहभागी होत आहेत. पुढील पंधरा दिवसामधे विविध उपक्रम राभवण्यात येत आहेत जसे की शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण / वादविवाद, कॉलेजमधभित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन, पत्रकार परिषद, प्रेस विज्ञप्ति, रेडिओवरील जिंगल्स जनजागृतीसाठी प्रसारित केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगीतले.     सक्षम -2023  दरम्यान महाराष्ट्र राज्यात 1000 पेक्षा जास्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच  इंधन आणि तेल संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलिइमचे यशउत्कर्ष त्रिपाठी आणि दया हंबीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.