मौजपुरी जिल्हा परिषद सर्कल व दोन्ही पंचायत समिती वर पुन्हा भापाचा झेंडा फडकणार – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे

15

जालना | प्रतिनिधी – जालना विधानसभा मतदारसंघातील मौजपुरी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुखाची बैठक मानेगाव (खा.) ता.जालना येथे आज दि.२२ रोजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा १०१-जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी श्री.दानवे यांनी शक्तीकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांशी संवाद साधताना म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात “बूथ सशक्तिकरण” मोहीम सुरू आहे त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती सर्कल मध्ये बैठकी घेत आहोत. सध्या भारतीय जनता पार्टीला विरोधक बदनाम करण्याचे काम करीत आहे. त्याच्या जोरावर आपल्याला जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा  डोलवायाचा आहे. त्याकरिता आपण काम करीत आहोतच, परंतु अजून जोमात काम करून पक्षाच्या निर्देशानुसार “वन बूथ थर्टी युथ “मोहीम अंतर्गत काम करून गाव पातळीवर आपले शक्तिकेंद्र व बूथ सशक्त केले पाहिजे. गाव पातळीवर वार्डात तसेच घराघरात पोहोचून जनसामान्यान पर्यंत भारतीय जनता पक्षाचे काम पोहोचविले पाहिजे. गावात वॉर्ड तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता आपण बूथ बळकट करून तयार केला पाहिजे. आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जिल्हा परिषद असो की पंचायत समिती भारतीय जनता पक्षाचा झेंडा डोलवीण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन करून सर्व शक्तीकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांच्या समस्यांचे निराकरण केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे यांनी बूथ कसे बळकट करावे व सरल ऍप मध्ये कशी माहिती भरावी या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वसंत शिंदे यांनी केले तर समारोप भाषण रामेश्वर पाटील भांदरगे यांनी केले, तर आभार डॉ.कळकुंबे यांनी केले.

या प्रसंगी प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदर्गे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पोहेकर, डॉ.कळकुंबे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर, तालुका उपाध्यक्ष परसराम मोहिते, ओ.बी.सी.मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, तालुका अध्यक्ष वसंत शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष अनिल सरकटे, मा.पंचायत समिती सदस्य मुकेश चव्हाण, सरपंच ज्ञानेश्वर राठोड, उपसरपंच दत्तात्रय जाधव, नारायण जाधव आदींसह सर्व शिक्तीकेंद्र प्रमुख व बूथ प्रमुखाची उपस्थिती होती.