जालना : जालना शहर हे उद्द्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. येथील उद्द्योजक व व्यावसायिकांनी जगाच्या नकाशावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. नुकतेच देशातील मोठे रेडिओ नेटवर्क असलेल्या बिग एफएम यांच्या वतीने आयोजित बिग इम्पॅक्ट अवॉर्ड्सचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालनाच्या एअर कंडिशनर्स तयार करणाऱ्या ऍप्रोकूल एअर कंडिशनर्स ठरला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख ब्रँड म्हणून सन्मान करण्यात आला असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र राठी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्विकारला.
सिने अभिनेते श्रेयस तळपदे, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्यासह भारतीय मनोरंजन उद्योगातील नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने हा पुरस्कार सोहळा रंगला. यावेळी बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघेल, क्विकहीलचे जॉइंट एमडी आणि सीटीओ संजय काटकर, प्रिझम सिटीचे दिलीप पटेल व गणेश कोतवाल, बीग एफएमचे बिझनेस हेड शैलेश श्रीवास्तव उपस्थित होते.
बिग एफएमच्या वतीने ऑटो, रिअल इस्टेट आणि अलाईड, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ आणि वेलनेस, एज्युकेशन, फॅशन, लाइफस्टाइल आणि इतर यासारख्या विस्तृत श्रेणीतील व्यवसायांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारांबद्दल बोलताना, बिग एफएमचे सीओओ सुनील कुमारन म्हणाले, BIG FM मध्ये, आम्ही त्यांच्या कामासाठी अतुट समर्पणाने स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या ट्रेलब्लेझर्सच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यावर ठाम विश्वास ठेवतो. ज्यांचे योगदान सकारात्मक बदलाची साखळी प्रज्वलित करत आहेत. अशा व्यवसायांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा आमचा BIG IMPACT अवॉर्ड्सचा प्रयत्न आहे, असे सांगितले. तर ऍप्रोकूल एअरकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र राठी म्हणाले की, पाच वर्षांच्या योजनेत आणि एअर कंडिशनर्सच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्रात कोणीही नसावे आणि आगामी वर्षांमध्ये प्रति 500 एअर कंडिशनर्स बनवण्याची आमची योजना आहे. तर जालना शहरासाठी हा सर्वात मोठा अभिमानाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ऍप्रोकूल एअर कंडिशनर्ससाठी सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख ब्रँड पुरस्कार प्राप्त ऍप्रोकूल एअरकॉन प्रायव्हेट लिमिटेड जालना शहरातील प्रतिदिन कंडिशनर्स तयार करणारी मोठी कंपनी आहे. ऍप्रोकूलने आतापर्यंत 3 महिन्यांत सुमारे 2000 एसी विकले आहेत. जे इतिहासात एकाच ब्रँडच्या शहरात विक्रमी विक्री आहे.तसेच ऍप्रोकूल हे दक्षिण आणि पश्चिम विभागातील रूम एअर कंडिशनर आणि व्यावसायिक एअर कंडिशनर्ससाठी हीट एक्सचेंजर कॉइलचे सर्वात मोठे उत्पादक आहे. सध्या ऍप्रोकूल हे भारतातील कॉइलच्या शीर्ष पाच उत्पादकांपैकी एक असून हे ऍप्रोकूल आणि ऍप्रोकॉप टीमच्या सर्वोत्तम प्रयत्नांचे यश आहे.