टेंभुर्णी । प्रतिनिधी – सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र महिना रमजान महिना सुरू असून या महिन्यात केलेले सर्व कार्य ते पवित्र समजतात. या महिन्यात घरातील लहान मोठे सदस्य हे रोजे ठेऊन नमाज करून उपवास करण्याचे त्यांच्यात महत्व आहे . येथील जेष्ठ व्यापारी आमेर अबुद बामसक यांच्या नातू मोहमद हमजा बामसक याने वयाच्या पाचव्या वर्षी रोजे ठेवत तब्बल 23 रोजे पूर्ण केल्या बद्दल त्यांच्या परिवार कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.