घनसावंगी । प्रतिनिधी – जिरडगाव तालुका घनसावंगी येथे दक्षिणामुखी मंदिराचा कलशारोहण सोहळा आज दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी शुक्रवारी संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सव सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. श्री जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे जीवना चरित्र कथेची ही आयोजन यावेळी करण्यात आली होते कथेचे सादरीकरण श्री ह भ प पांडुरंग महाराज आनंदी ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था जाम समर्थ यांनी केले. या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण माणिक महाराज रेंगे जांब श्री हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद करंजीकर श्री हरिभक्त परायण पंडित महाराज क्षीरसागर आळंदी देवाची श्री हरिभक्त परायण महंत महादेव महाराज गिरी सराटे आंतरवाली श्री ह भ प केशव महाराज चावरे यांना पैठण श्री ह भ प वेदांताचार्य गणेश महाराज कोल्हे रामनगर श्री ह भ प गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले श्रीक्षेत्र पैठण यांचे कीर्तन दिनांक 14 – 4 – 2023 शुक्रवार रोजी पासून दिनांक 20 – 4 -2023 गुरुवारपर्यंत सेवा संपन्न झाले. तर आज सकाळी दहा वाजता श्री ह भ प चांगदेव महाराज काकडे यांचे काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. काल्याचे किर्तन संपल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचे जनक लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की माझा जन्म वारकरी कुटुंबात झाला असून माझे आजोबा माझे आई वडील व माझे चुलते सर्व विठ्ठलाचे भक्त होते वारकरी होते ते कधीही वारी चुकवत नव्हते मी सुद्धा गेल्या 30 वर्षापासून विठ्ठलाची नियमित वारी करत असून दरवर्षी एक एक किंवा दोन दिवस मी वारीमध्ये सहभागी होऊन देवदर्शनाकरता जात असतो. मी वारकरी असल्याने मला मंत्री पदाची संधी मिळाली त्या संधीचं सोनं मला करता आलं मिळालेल्या संधीमुळे माझ्या मतदारसंघात आणि जालना जिल्ह्यात विजेचे जाळे तयार करता आलं रस्त्यात जाळू भिंत आलं मराठवाडा वाटर ग्रीड योजना परतुर विधानसभा मतदारसंघात यशस्वी होऊ शकली माझ्या मतदारसंघात 300 गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय झालेली असून घराघरात बारा रुपयात 1000 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. बारामती पेक्षाही माझ्या मतदारसंघाचा विकास चांगल्या दर्जाचा झालेला आहे. यावेळी जिरडगाव या गावातील व परिसरातील हजारो महिला व पुरुष भक्त उपस्थित होते.