जालना । प्रतिनिधी – काकडे कंडारी येथिल विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली. अनुषंगाने दि 19/04/2023 रोजी ग्राम पंचायत कार्यालय कंडारी येथे विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवड करण्या करीता सहकार विभागाचे श्री कोलते साहेब व सेक्रेटरी श्री यादव यांच्या उपस्थितीतमधे बैठक संपन्न झाली.
बैठकीमध्ये सर्व संमतीने सौ.वंदना लिंबाजी काकडे यांची चेअरमन पदी तर भगवान अंबादास काकडे यांची व्हॉईस चेअरमन पदी निवड करण्यात आली..
यावेळी वी.वी.का.सो.चे नवनिर्वाचित सदस्य सर्व श्री बजरंग देविदास काकडे, सय्यद नबी सैयद मुसा, भगवान यशवंतराव काकडे, भगवान पाईकराव, शेषेराव गणगे, बाबुराव भानुदास काकडे, सूर्यभान काकडे, शिवाजी आसाराम काकडे,नारायण मारोती काकडे, मधुकर भुसारे, विजयमाला नामदेव काकडे यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेवून एकमताने निवड केली.
यावेळी सरपंच जगन्नाथ काकडे यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे पुष्पहार देवून अभिनंदन केले. यावेळी लिंबाजी काकडे, पांडुरंग काकडे, नारायण दासाराव काकडे, अनंता काकडे, सीताराम काकडे, वैजनाथ काकडे, गजानन शिवाजी काकडे, लक्ष्मण देविदास काकडे, गजानन ज्ञानोबा काकडे, अंशिराम गनगे, कैलास काकडे, राजू काकडे, विठ्ठल काकडे, एकनाथ सीताराम, दत्ता एकनाथ, विठ्ठल मारोती काकडे यांची उपस्थिती होती.