परतूर पोलीस स्टेशन येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

15

परतूर । प्रतिनिधी – पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. परतुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यावेळी बोलतांना असे म्हणाले की, मुस्लिम समाजातील पाक महिना म्हणजे रमजान या महिन्यात मुस्लिम बांधव एक महिना पूर्णपणे रोजा ठेवतात, यामध्ये आपलाही कुठला वाटा पाहिजे याअनुषंगाने आपण आज या इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. परतुर पोलीस स्टेशन येथे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते याहि वर्षी ठेवण्यात आले होते.
यावेळी शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, नितीन जेथलीया,बाबासाहेब गाडगे, दया काटे, अखिल काजी, रहेमु कुरेशी, आयुब कुरेशी, कदिर कुरेशी, वैजनाथ बागल, नासेर चाऊस, वकील संघाचे वेडेकर, सुरेश काळे,सर्व पत्रकार बांधव, गुप्तवार्ताचे संजय वैद्य, गजानन राठोड सह आदी मुस्लिम बांधव, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.