जालना । प्रतिनिधी – जालना राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश चव्हाण यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दिनांक 20 एप्रील 2023 रोजी जाहीर प्रवेश केला व पुढील आठ दिवसात अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार आहे.
यावेळी मुकेश चव्हाण म्हणाले की, जालना तालुक्यासह जिल्हयात राष्ट्रवादी पक्षाला स्कोप नाही राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत येण्याची स्थिती नसल्यामुळे मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्हयाचा केलेला विकास पाहून मी प्रवाहित झालो त्यामुळे भाजपा पक्ष हा देशात , राज्यात व जिल्हयात सत्ता असल्यामुळे माझ्या परीसराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही म्हणून मी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच पढील आठवडया मध्ये माझ्या समर्थाकास राष्ट्रवादी पक्षा मधील अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश सोहळा होणार असे मुकेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भागवत बापू बावणे, तालुकाध्यक्ष वसंत शिंदे. परसराम तळेकर, संजय डोंगरे, बाबूलाल चव्हाण, अनिल सरकटे,दत्ता जाधव, नारायण जाधव, कृष्णा गायके, उद्धव ढवळे, विकास कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.