जालना | प्रतिनिधी – जालना तालुक्यातील घाणेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शहर खडके यांची तर व्हॉईस चेअरमनपदी सौ. माया अण्णासाहेब चित्तेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
घाणेवाडी विविध सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणुक मागील कालावधीत बिनविरोध झाली होती. संचालक पदाची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर आज गुरूवारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात आज निवडुण आलेल्या सर्व संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चेअरमन पदासाठी शरद खडके यांचा तर व्हॉईस चेअरमन पदासाठी सौ. मायाबाई अण्णासाहेब चित्तेकर यांचे प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकार्यांनी घोषीत केले. या बैठकीस संचालक सर्वश्री शिवाजी सोनवने, प्रदिप लहाने, कठाळसिंग राजपुत, सुधाकर निकाळजे, सुरेश खंडाळे, भागवत बावने, मच्छिंद्र कापसे, त्रिंबक कापसे, सुभाष कावले, सिंधुबाई लहाने यांची उपस्थिती होती.
या निवडीनंतर जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आर. आर. खडके पाटील यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उप सरपंच गणेश सोनवने, ड. संजय खडके, अवचितराव कदम, रामेश्वर खडके, सोपान कावले, वैजिनाथ कावले, अंकुश खडके आदींची उपस्थिती होती.