जालना । प्रतिनिधी – जालना शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. पसरलेली अस्वच्छता दुर करण्यात यावी आणि नागरीकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी गुरूवार रोजी रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यांसह जोरदार धरणे आंदोलन केले. याप्रसंगी नगर परिषद प्रशासनाविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी सुविधेसाठी एक सविस्तर निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी केशव नेटके यांना देण्यात आले.
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनेक दिवसांपासून खंडीत होत असल्यामुळे नागरीकांना तिव्र पाण्याच्या टंचाईस तोंड द्यावे लागत होते आणि शहरातील दैनंदिन स्वच्छता नाममात्र होत असल्यामुळे आणि नागरी सुविधेचा मोठा अभाव निर्माण झाल्यामुळे याविषयी आ. कैलास गोरंट्याल यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना वेळोवेळी तक्रारी करून देखील याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गुरूवार रोजी आ. गोरंट्याल यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबविला होता. या आंदोलनामध्ये आज आ. कैलास गोरंट्याल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी आपला सहभाग नोंदवून नगर परिषद प्रशासनाविरूध्द मोठा रोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांनी अल्टीमेटन देतांनी सांगीतले की, शहराला पाणीपुरवठा करणार्या घाणेवाडी आणि जायकवाडी येथे मोठा पाण्याचा साठी उपलब्ध असतांना केवळ नगर पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याच्या तिव्र टंचाइला तोंड द्यावे लागत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगीतले. शहरातील स्वच्छतेसाठी पुर्ण यंत्रणा आणि घंटागाड्यांसह कर्मचारी उपलब्ध असून सुध्दा शहरातील स्वच्छता होत नाही. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल यांच्या कारकीर्दीत शहराला पुरेसा पाणीपुरवठा आणि शहराच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आल्यामुळे लोकांना वेळेच्या आत नागरी सुविधा मिळत होत्या. न. प. येथे प्रशासक येवून दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतू या प्रशासकीय अधिकार्यांनी नागरी सुविधेची पुर्ण यंत्रणा मोडकळीस नेऊन ठेवली आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबतीत गंभीर दखल घ्यावी नसता मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा श्री गोरंट्याल यांनी दिला.
याप्रसंगी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, दिनकर घेवंदे, गणेश राऊत, नंदाताई पवार, ड. राहुल हिवराळे, अरूण मगरे, वाजेद खान, सय्यद मुस्ताक, राज स्वामी, मुख्तार खान यांनी आपल्या भाषणामधून नगर परिषदेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करून नगर परिषदेची यंत्रणा नागरी सुविधा देण्यासाठी अपयशी ठरली तर आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात घेराव आंदोलन करण्यात येइल असा इशारा यावेळी या मान्यवरांनी दिला.
याप्रसंगी राम सावंत, बाबुरावमामा सतकर, महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, जिवन सले, विष्णू वाघमारे, विनोद रत्नपारखे, हरिष देवावाले, सय्यद अजहर, आरेफ खान, किशोर गरदास, शेख शकील, श्रावण भुरेवाल, जगदिश भरतीया, संजय भगत, सोनु सामलेट, राधाकिशन दाभाडे, विनोद यादव, संगीता पाजगे, पुनम राज स्वामी, सुषमाताई पायगव्हाणे, चंदाताई भांगडीया, मथुराबाई सोळुंके, मंगलताई खांडेभराड, मंजु यादव, सय्यद करीम बिल्डर, कलिम खान, चंद्रकांत रत्नपारखे, फकीरा वाघ, संजय पाखरे, वैभव उगले, प्रमोद अल्हाट, फकीरा वाघ, अनिल कांबळे, गुलाब खान, किशोर कदम, योगेश पाटील, अजिम बागवान, गणेश चांदोडे, शेख शमशोद्दीन, योगेश पाटील, नदीम पहेलवान, शेख वशिम, शेख इब्राहिम, अंकुश राजगिरे, दाविद गायकवाड, जॉर्ज उगले, रहिम तांबोळी, छोटू चित्राल, माणिक चव्हाण, राजु चव्हाण, गणेश खरात, अंजाभाऊ चव्हाण, शिवाजी गायकवाड, कृष्णा पडूळ, सोपान तिरूखे, रघुविर गुढे, अमोल सरवडीकर, राजन बर्टी, विलास जगधने, वल्लभ कुलकर्णी, सिराज पटेल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी गटनेते गणेश राऊत यांनी केले.