अक्षय तृतीया निमित्त मातीच्या कराची मोठी विक्री कारागीर दत्ता राऊत यांची माहिती

27

टेंभुर्णी । प्रतिनिधी – अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पूजनासाठी मातीच्या कराचा उपयोग करावा लागत असल्याने येथील आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मातीच्या करांची विक्री झाल्याचे कारागीर दत्ता राऊत यांनी सांगितले अक्षय तृतीयेसाठी प्रत्येक घरी पूजनासाठी हिंदू संस्कृतीनुसार मातीचे भांडे वापरावे लागते त्याला कर म्हणतात
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाढवडिलांना आमरसाचे जेवण दिले जाते यानिमित्ताने या करा मध्ये पाणी ठेवून जेवणाचा नैवेद्य करा समोर मांडला जातो यामुळे हिंदू संस्कृतीत वाडवडिलांना जीव घालण्यासाठी या करांची आवश्यकता असते यामुळे सोमवारच्या आठवडी बाजारी मध्ये मोठ्या प्रमाणावर ही मातीची भांडी विकणारे कारागीर आलेले होते पन्नास रुपयांमध्ये एक लहान व एक मोठे कर अशी जोडी विकली गेली करांची निर्मिती करण्यासाठी माठ तयार करून त्याला लाल रंग दिला जातो. या दोन्ही मातीच्या भांड्याना कर व केळीही म्हटले जाते.
रंग दिल्यानंतर आव्यामध्ये भाजून तो विक्रीसाठी तयार केले जात असल्याचे उत्पादक दत्ता राऊत यांनी सांगितले या कामी आपले संपूर्ण कुटुंब आपल्याला सहकार्य करते माठ निर्मितीसाठी लागणारी माती सहज उपलब्ध होत नाही त्याचे खरेदी करावी लागते. कोरोनामुळे दोन वर्षांपूर्वी करांची मागणी घटली होती दरम्यान यंदा मोठ्या प्रमाणावर कर विक्री झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाल्याचे ही श्री राऊत यांनी सांगितले.
साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त असून या निमित्ताने वाढवडिलांना जेवण दिले जाते यामध्ये कर म्हणजे पुरुष व केळी म्हणजे महिला असे समजून पितृदेवताला खुश करण्यासाठी या सणात महत्त्व आहे दरम्यान याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माण केले असल्याचेही लिखित आहे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केलेले पूजन दानधर्म हे विजय पताका फडकविण्यासाठी लाभकारक ठरते असे टेंभुर्णी येथील पुरोहित विठ्ठल शेंबेकर यांनी सांगितले.