टेंभुर्णी शहरात अनेक चिमुकल्यांनी ठेवला जीवनातील पहिला उपवास

100
टेंभुर्णी | प्रतिनिधी – सद्या पवित्र रमज़ान महीना सुरु असून शेवट चा भाग (आखरी अशरा) सुरु आहे. आतापर्यंत २७ रोज़े झाले असून मार्च-एप्रिल च्या कड़क उन्हाळयात ही टेंभुर्णी शहरातील अनेक चिमुकल्यांनी ठेवला आपल्या जीवनातील पहिला उपवास धरला आहे.
टेंभूर्णी येथील शेख नजमोद्दीन यांची मुलगी शारीया वय ९ वर्ष, अनस अफसर शेख वय ९ वर्ष, मसिरा ताहेर शेख वय ८ वर्ष, शरिया अहमद शेख वय ८ वर्ष, हाजरा फयास सय्यद वय ८ वर्ष,अबीर हमजा बामीद्रक वय ६ वर्ष, उज़ेर रफ़ीक पठाण वय १० वर्ष, आयशा निजाम पठान वय ९ वर्ष, उज़ेर गफ्फार बागबान वय ८ वर्ष, सुरेन जावेद बागबान वय ८ वर्ष, बरीरा वसीम बागबान वय ८वर्ष, उमेमा सादिक़ खान वय ५ वर्ष, नशरा हमीद शेख़ वय ७ वर्ष,  यहिया इस्माईल खान वय ९ वर्ष, तहा इस्माईल खान वय ७ वर्ष, अरफ़ात नज़ीर शेख़ ८ वर्ष,इशरत नवाब शम्सुलइस्लाम वय ७ वर्ष,
 या सर्व चिमुकल्यांनी पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
 त्या बद्दल सर्वांच्या आईवडिल, आजी आजोबा व नातेवाईक व मित्रांनी भर भरून शुभेच्छा दिल्या.