जालना । प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवार दि.26 एप्रिल 2023 रोजी जालना शहरात ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ही ओबीसी परिषद आयोजित करण्यात आली आहे. जालना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दि.26 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता ही ओबीसी परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे व भालचंद्र भोजने
हे या परिषदेचे मुख्य संयोजक आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, प्रा.सोमनाथ साळुंखे व गोविंद दळवी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. सविताताई मुंढे , जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट आदी या परिषदेस मार्गदर्शन करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा सचिव राजेंद्र वांजोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या ओबीसी परिषदेत ओबीसींची जनगणना, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण, सरकारी नोकर्यामधील तसेच उच्च शिक्षण संस्था मधील आरक्षण व राजकीय जागृती यासारख्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा व विचार विनिमय करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवानी या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य संयोजक डेव्हिड घुमारे, जिल्हाध्यक्ष ( पूर्व) भालचंद्र भोजने, वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रमाताई होर्शील, जिल्हा उपाध्यक्ष अकबर इनामदार, परमेश्वर खरात, शफीक अत्तार, विलास पाचारणे,सतीश खरात, खालेद चाऊस,संतोष आढाव, राजेंद्र खरात, जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, शहराध्यक्ष नंदकिशोर रामरख्या,मनोज शर्मा,अमोल कस्तुरे,रोहन वाघमारे,प्रकाश मगरे,भानुदास साळवे,प्रकाश बोर्डे, अमोल लोखंडे आदींनी केले आहे.