टेंभुर्णी येथे ईद निमित्त शांतता कमिटी बैठक शांततेत; गावातील सामाजिक एकता अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा – रविंद्र ठाकरे

13

टेंभुर्णी । प्रतिनिधी – येथील सणाची पार्श्वभूमी पाहता येथील होणार्‍या सना बाबत परिस्थिती जशी पाहिजे तशी चांगली नसल्याची खंत या बैठकीत रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केली. येथे प्रत्येक समाजा-समाजात येथे कटुता पाहण्यात येत आहे. यात सोशल मीडिया मुळे मोठी परिस्तिथी हाताबाहेर जात असल्याची दिसून येत आहे. कोणताही सण हा त्या समजा पुरता मर्यादीत नसून त्यांच्या कार्याचा परिणाम दुसर्‍या समाजावर ही होतो. त्यामुळे यांचा परिणाम पुढे गंभीर न होता त्याची काळजी घेण्याची गरज असल्याची विशेष चर्चा यावेळी झाली. सणानिमित्त निघणारे डी जे बॅनर या बाबत चर्चा करण्यात आली. समाजातील काही तरुण मंडळी हेतू पुरस्कर गावातील वातावरण खराब करताहेत. असे जे कोणी तरुण हे करत आहे त्यांच्यावर आमची पूर्ण नजर आहे. अशांवर योग्य कार्यवाही करण्याची हमी यावेळी श्री ठाकरे यांनी दिली. उगाच कोणत्याही मंदिर-मस्जिद जवळ येऊन गैर कृत्य करू नये आणि करणार्‍यांवर लवकर कारवाई करावी अशी मागणी सर्व उपस्थितांनी यावेळी केली. गावातील सामाजिक एकता अबाधित ठेवण्यासाठी उपस्थित सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज यावेळी श्री ठाकरे यांनी व्यक्त केली.
येथील सर्व समाज गुन्या गोविंदाने उत्सव साजरे करतात. गैरकृत्यात राजकीय मंडळींचा सहभाग असल्याची चर्चा याप्रसंगी झाली. या बैठकीला शांतता कमिटीचे सदस्य व गावातील सर्व समाज मंडळी उपस्थित होती.
या वेळी माझी सरपंच तसेच तंटा मुक्त समितीची अध्यक्ष विष्णू जमधडे उपसरपंच संतोष पाचे माझी सरपंच एल व्हि शिंदे, मा अध्यक्ष पी जी तांबेकर,माझी सुभेदार पि के वाघमारे, गणेशलाल सोमाणी, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचेजिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ता देशमुख, जाफराबाद तालुका कौन्सिलचे अध्यक्ष शेख अशपाक माजि ग्राम पंचायत सदस्य मोईन बागवान, मुबारक चाऊस व्यापारी महासंघाचे जिल्हा सदस्य अलकेश सोमाणी, चेयरमैंन रावसाहेब अंभोरे शेख नसीम गुरुजी, फैसल चाऊस, भिवसन ससाणे सर शारेक सिद्दीकी, ताहेर शेख, कुरेशी सेठ,अशोक पाबळे शेख अहमद अखीम सिद्दीकी,किशोर कांबळे अब्दुल नबी, साबेर सर यांच्या सह अनेक मंडळी हजर होती. टेंभुर्णी प्रथमच सर्व जातीचे सदस्य बोलावून ठाकरे यांनी वरील प्रमाणे सूचना देऊन गावची परिस्थती किती खराब आणि चिंताजनक आहे यांची माहिती देऊन यात सर्वांची जवाबदारी चांगली वाढली असून सर्वांनी काळजी घेण्याचे आव्हान केले. शांतता कमिटीचे सदस्य शेख नशीम सर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, टेंभुर्णी ची परंपरा ही पाची पोरांची परंपरा असून या ठिकाणी सर्व सण उत्सव गोविंदाने साजरी केले जातात. धार्मिक जातीय सलोखा या गावांमध्ये फार पूर्वीपासून आहे. निजाम राजवटीत सुद्धा या गावात सर्व लोक पुन्हा गोविंदाने राहत होते. परंतु आत्ताची तरुण पिढी, वेगळ्या मार्गाकडे जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे, असा अंदाज येत असून या सर्व तरुणांना, समुपदेशनाद्वारे, समजावून सांगण्याची गरज, प्रत्येक समाजातल्या प्रमुख माणसांवर येऊन पडल्याची चित्र निर्माण होताना दिसत आहे. चांगलं नसण्याची संकेत आहे. यासाठी प्रत्येक समाजातील प्रमुख व्यक्तींनी या तरुणांना समुपदेशनाद्वारे समजावून सांगून, त्यांना सकारात्मक दृष्टीने पुढे नेण्याचं काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यासाठी अनेकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामध्ये अनेक शिक्षक समाज सुधारक यांची गरज आहे. अशांनी या युवकांना योग्य दिशा देऊन सकारात्मक दृष्टीने पुढे जाण्याचं काम करता कसे येईल व पुढे जाण्याचे युवकांना, दिशा देण्याचं काम त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण करण्याचं काम. यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरण्याची संधी निर्माण करण्याचं काम आता समाजापुढे येऊन ठेपलेला आहे त्यामध्ये अनेक आणि पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. सर्व सदस्यांनी सामाजिक एकता राखण्याचं काम यासाठी सर्व गावातील लोक एकत्रित आहोत अशी भावना निर्माण केली आणि सर्वांनी आम्ही सर्व एकत्रित काम करण्याची गरज आहे हे मान्य केले.