टेंभुर्णी | जाफराबाद | प्रतिनिधी – दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी प्रमुख मान्यवर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात लातुर येथे शासकीय विश्रामगृहात रुग्ण हक्क संरक्षण समितीची वार्षिक आढावा बैठक पार पडली.
वर्ष 2022-23 चा वार्षिक अहवाल वाचन करून 2023-24 वर्षाच्या कामाचे नियोजनात्मक धोरण ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली,शिवाय मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र,खान्देश,कोकण आणि इतर सर्वच विभागावार बैठक आयोजित करून माहिती पुस्तिका तयार करणे,ज्या मध्ये समितीच्या सर्व पदाधिकार्यांचे संपूर्ण नाव,पदनाम,आणि फोननंबरसह पत्ता आदी माहिती समाविष्ट करून समितीच्या पदाधिकार्यांचे कर्तव्य नी जबाबदारी व अधिकार तसेच प्रचलित नियमांची माहिती समाविष्ट करणे महत्वाचे असून त्याची माहिती सदस्यांना देण्याचे ठरले.
तसेच राज्यशासनाकडून समितीच्या सर्व पदाधिकार्यांचे संरक्षण करण्यात यावेत आणि तालुका त्याच प्रमाणे जिल्हास्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय आरोग्य समितीवर रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या किमान एका सदस्याला निमंत्रित सदस्य किंवा अशासकीय सदस्य नियुक्त करण्यात यावेत,अशी शासनाकडे मागणी करण्याचे बैठकीत ठरले आहे.
एकंदरीत सदर बैठकित उपरोक्त विषयी चर्चा करून बैठक संपन्न झाली. बैठकीला रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पुढील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते ज्यामधे श्री अॅड,नीलेशजी करमुडी (समिती प्रमुख),श्री हनुमंत गोत्राळ (प्रदेशाध्यक्ष),श्री शिवाजीराव चव्हाण (प्रदेश कार्याध्यक्ष),श्रीमती रेणुकाताई बोरा (महिला आघाडी उपाध्यक्ष),श्री नरेंद्रजी बोरा (प्रदेश संघटक),श्रीमती पुजाताई निचळे (मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षा),श्री शंकररावजी सोनवणे (संपर्क प्रमुख),श्री रामेश्वर गंगावणे,संभाजीनगर (मराठवाडा कार्याध्यक्ष),श्री संतोषरावजी हादवे (हिंगोली जिल्हाध्यक्ष),श्री सुनीलअण्णा डोईजड (नांदेड जिल्हाध्यक्ष),श्री अमोल वाकुडे (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष),यासह समितीचे इतरही सदस्य या प्रसंगी उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री हनुमंत गोत्राळ यांनी केले,तर आभार प्रदर्शन दैनिक युवा पर्व आणि धझच् छएथड उकAछछएङ चे संपादक श्री रवि बिजलवाड यांनी केले.