जालना । प्रतिनिधी – अनेक तक्रारी आणि सुचना देऊनही नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यपुर्वक लक्ष न दिल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच दैनंदिन स्वच्छतेकडे कानाडोळा केल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली असून नागरी सुविधांचा देखील आभाव वाढल्यामुळे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली दि. 20 एप्रिल गुरूवार रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तत्कालीन नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष देवून नागरीकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतू जालना नगर पालिकेवर गेल्या वर्षभरापासून प्रशासकाची नियुक्ती झाल्यापासून नागरीकांना नागरी सुविधेला प्रकर्षाने तोंड द्यावे लागत आहे. ही बाब शहरातील नागरीकांनी आणि आ. कैलास गोरंट्याल यांनी प्रशासक आणि मुख्याधिकार्यांना नागरी सुविधाकडे अधिक लक्ष देण्यासाठी वारंवार सांगीतले आहे. परंतू प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न. प. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे ताबडतोब लक्ष द्यावे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि दैनंदिन स्वच्छता करण्यात यावी आदी मागण्यासाठी गुरूवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी गटनेते गणेश राऊत, बदर चाऊस, नंदाताई पवार, दिनकर घेवंदे, शेख शमशोद्दीन, आनंद लोखंडे, माजी नगरसेवक महाविर ढक्का, रमेश गौरक्षक, राहुल हिवराळे, विनोद रत्नपारखे, जगदिश भरतीया, जिवन सले, विष्णू वाघमारे, सय्यद अजहर, वाजेद खान, आरेफ खान, शेख मुजीब, शेख शकील, राधाकिशन दाभाडे, अरूण मगरे, सय्यद मुस्ताक, फकीरा वाघ, डॉ. विशाल धानुरे, चंद्रकांत रत्नपारखे, शेख इब्राहिम, बाबासाहेब सोनवने, कलिम खान, वैभव उगले, गणेश चांदोडे, प्रमोद अल्हाट आदींनी केले आहे.