जालना । प्रतिनिधी – जालना शहरात नुकतीच नवीन रस्त्यांच्या कामासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल आपले अभिनंदन. ज्यावेळी ज्या ज्या ठिकाणी शहराच्या मुख्य भागामध्ये रस्त्यांची कामे सुरू होतील त्यावेळी निविदा काढतांना रस्त्याच्या एका बाजूला स्वच्छतागृह हे बांधकाम ठेकेदाराकडून बांधून घेण्यात यावे. कारण शहरात बाहेर गावाहून तसेच शहरातील नागरीक खरेदीसाठी येत असतात त्यांना शहरात कोठेही स्वच्छतागृह दिसत नाही, विशेष करून महिलांना अतिशय त्रास होतो.
अंबड चौफुली ते नूतन वसाहत मधील उड्डाण पूल, रेल्वे स्टेशन ते गांधी चौक, पेशवा चौक ते लक्कडकोट, कन्हेय्यानगर, बडीसडक, भाग्या नगर येथील रस्त्यांची कामे चालू होणारआहेत, या भागात कोठेही स्वच्छतागृहे नाहीत, या भागात स्वच्छतागृहांची नितांत आवश्यकता
आहे. या भागात रस्त्यांची कामे करताना ठेकेदाराकडून स्वच्छता गृहांची कामे करवून घेण्यात यावी व ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नामधारी शुल्क ठेवून त्यानांच देण्यात यावी म्हणजे शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल व नागरिकांची सोय होईल.
या निवेदनावर रसनादेहेईकर,रमेश देहेडकर ,दिनकर घेवंदे,श्रीकांत शेलगावकर, तय्यबबापू देशमुख धर्मा खिल्लारे,मंगल खांडेभराड आदींच्या सह्या आहेत.