जालना | प्रतिनिधी – सौ. शकुंतला अशोक हुरगट यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत ती आपल्या हस्ताक्षराने लिहून काढली. सदर हस्तलिखीत ज्ञानेश्वरीचे विमोचन एकादशीच्या शुभमुहूर्तावर ह. भ. प. योगीराज लोखंडे महाराज व ह. भ. प. बाबुराव व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. लोखंडे महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महात्म्य समजावून सांगितले. सदर ग्रंथ हा ज्ञानाचा सागर असल्याचे सांगून ज्ञान, विज्ञानाने परिपूर्ण अशा या ग्रंथाची एकतरी ओवी अनुभवावी, असे आवाहन केले. ह. भ. प. बाबुराव व्यवहारे यांनी सौ. हुरगट यांच्या धार्मिक वृत्तीचे गुणगान करून आशीर्वाद दिले.
याप्रसंगी ओमप्रकाश धानवाला, रामकुंवर अग्रवाल, अशोक मिश्रा, रमेश गर्ग, रुक्मिणीकांत दिक्षीत, कमल गोयल, निशा हुरगट, रूचा हुरगट, सौ. मोहीनी डागा, सुनिता डागा आदींची उपस्थिती होती. अशोक हुरगट यांनी सर्वांचे स्वागत केले तर अशोक मिश्रा यांनी आभार मानले.