ग्लोबल गुरुकुल स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतूक सोहळा, शाळेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी मदत करु – डॉ.कराड

30

जालना : ग्लोबल गुरुकुल स्कुलच्या प्रगतीसाठी भविष्यात आपण सर्वोतोपरी मदत करुन ही शाळा आणि या शाळेचे वसतीगृह हे विद्यार्थ्यांनी फुलून गेलेले असेल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे बोलतांना केले.
डॉ. कराड यांच्या उपस्थितीत ग्लोबल गुरुकुल स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतूक सोहळा पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. कराड बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री श्री. अतुल सावे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, अमीत आनंद, डॉ. गादिया, डॉ. साबू, डॉ. भरतीया, डॉ. छाबडा, डॉ. ओम अग्रवाल, सुनील अग्रवाल, अ‍ॅड. सतीश तवरावाला, डॉ. चंचल आनंद, डॉ. रितेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. कराड म्हणाले की, ग्लोबन गुरुकुल स्कुलने विद्यार्थ्यांचे हित जोपासतांनाच सामाजिक जबाबदारी ओळखून काम सुरु केलेेले आहे. त्यामुळे या शाळेच्या वसतीगृहासाठी आपण शंभर विद्यार्थी देण्याचा संकल्प केला आहे. भविष्यात या शाळेने मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेजचे उपक्रम राबवावेत, यासाठी आपण सर्वोतोपरीने मदत करु, अशी ग्वाहीही डॉ. कराड यांनी दिली.
ग्लोबल गुरुकुल स्कुलच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रद्युम्न गोरे, समृध्द मराठे, वरद बुलबुले, निशांत कोल्हे, विद्या काळे, जयश्री खरोटे आदींचा गौरव करण्यात आला.यावेळी उपस्थितीत डॉक्टरांसह मान्यवरांंनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी पवन भुरेवाल, जयश्री पवार, शकुंतला पाटील, राहुल रघुनाथ, बालाजी गोल्डे, ऐश्वर्या साळवे, राजपाल पाचा, सोनिका अग्रवत, सुनिता जैथमहाल, शिवानी राजपूत, गजानन शिंदे आदींनी परिश्रम घेतले.