मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव समितीचे राज्य समन्वयक म्हणून प्रदेश प्रवक्ते डॉ संजय लाखे यांची नियुक्ती

17

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव समितीचे राज्य समन्वयक म्हणून डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती काँग्रेस कडून गठीत करण्यात येत आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आणि विशेषतः स्वातंत्र्यानंतर पारतंत्र्यात राहिलेल्या भागात विविध कार्यक्रम या समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण आहेत.
दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र, निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाडा तसेच चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांसह संपूर्ण हैद्राबाद संस्थान पारतंत्र्यातच राहिले. निजामाने स्वतंत्र भारतात सामिल होण्यास नकार दिल्याने थोर गांधीवादी नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्तिसंग्राम सुरू झाला. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी बलिदान दिले, अत्याचार सहन केला. अखेर भारत सरकारने हैद्राबाद संस्थानामध्ये पोलीस कारवाईला सुरूवात केली व दि. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले. महाराष्ट्रात या लढ्याला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणून ओळखले जाते.
दि. 17 सप्टेंबर 2022 पासून या ऐतिहासिक लढ्याचे 75 वे अर्थात अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. खरेतर हे वर्ष शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे होणे आवश्यक होते. त्याबाबत राज्य सरकारला अनेकदा स्मरणही करून देण्यात आले. मात्र, मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाबाबत शासनाची सतत अनास्था व उदासीनताच दिसून आली आहे. हे ऐतिहासिक 75 वे वर्ष सुरू होऊन आता 7 महिने उलटले आहेत. तरीही राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही लक्षवेधी व व्यापक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून येत नाही.
या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्या लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या हेतूने मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समिती गठीत करण्यात येत आहे.आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः जून्या निजामस्टेट मधील महाराष्ट्रात जिल्हा , तालुका आणि ग्राम स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.! या समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री मा अशोकराव चव्हाण यांची तर सह अध्यक्ष म्हणून माजी मंत्री अमित देशमुख आणि बसवराज पाटील मुरूमकर यांची तर मुख्य समन्वयक म्हणून डॉ संजय लाखे पाटील यांची नेमणूक केली आहे.!
राज्याचे नेते मा अशोकराव चव्हाण आणि नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमितभैय्या देशमुख आणि बसवराज पाटील या प्रमुख नेत्यांसह सर्वच समिती सदस्यांच्या सक्रिय सहकार्याने मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरवासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे डॉ संजय लाखेपाटील यांनी सांगितले.!
डॉ संजय लाखेपाटील यांच्या या निवडीबद्दल जालना जिल्ह्यातील काँग्रेस चे नेते आ कैलास गोरंट्याल, जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार, जेष्ठ नेते रामप्रसाद भाऊ कुलवंत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ राजेश राठोड, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमुद, माजी आमदार सुरेश जेथलिया, खडकेअण्णा, अंकुश शेठ राऊत,सुभाष कोळकर,माऊली कदम , ज्ञानेश्वर भांदरगे, दत्तात्रय मोरे, सुभाषराव मगरे, पाबळे, प्रभाकर पवार, नंदाताई पवार, सत्संग मुंढे, कल्याणराव दळेड राम कु-हाडे , शरद देशमुख राम सावंत ,वसंत राजे जाधव, विजय चौधरी, सुरेश गवळी , राजू गोरे ,जावेद बेग, राहूल देशमुख, नारायण वाडेकर, सोपान सपकाळ ,सचिन लिपने, निलकंठ वायाळ, बदर चाऊस आदींनी अभिनंदन केले आहे.