केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा; मराठवाडा संघठनमंत्री संजय कौडगे यांचे भाजपा बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांना आवाहन

17

जालना । प्रतिनिधी – भाजपाच्या बुथ व शक्तीकेंद्र प्रमुखांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना सर्व सामान्यजनते पर्यंत पोहचून संघठन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भाजपा मराठवाडा संघठनमंत्री श्री.संजय कौडगे यांनी जालना शहरातील जिल्हा पदाधिकारी, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी मंडळ अध्यक्ष, मोर्चा / सेल अध्यक्ष , शक्तीकेंद्र व शक्तीकेंद्र विस्तारक व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा निमंत्रीत सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक अन्ना पांगारकर,अल्पसंख्यांक मोर्चा सरचिटणीस अतिक खान,महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ.संध्याताई देठे, भाजपा जिल्हा संघठन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, चंपालाल भगत,भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, मराठवाडा युवती प्रमुख शर्मिष्ठा कुलकर्णी, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा सौ.शुभांगीताई देशपांडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर यांची प्रमुख उपस्थीती होती.
यावेळी शक्तीकेंद्र विस्तारक व शक्तीकेंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन करतांना कौडगे म्हणाले की, प्रत्येक बुथ मजबुत असेल तर निवडणुक जिंकता येतात त्यासाठी बुथवर सर्वजातीधर्माच्या लोकांना समावून घेवून नवीन मतदाराची जास्तीजास्त नोंदणी करुन,बुथ जर मजबुत असेलतर जालना नगर परीषद ताब्यात येण्यास वेळ लागणार नाही केंद्र व राज्य सरकारच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवून त्या जनतेपर्यंत पोहचून त्यांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा होईल याकडे कार्यकर्त्यांनी व बुथप्रमुखांनी लक्ष दयावे गेल्या तीन वर्षापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिल्या जात आहे अशा अनेक प्रकारच्या जनकल्याणकारी योजना आहेत त्या जनतेपर्यंत राबवून संघठन वाढीसाठी बुथप्रमुख व शक्तीकेंद्रप्रमुखांनी करावे असे संजय कौडगे यांनी आवाहन केले.
यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस रोषण चौधरी, सोपान पेंढारकर, सिदेश्वर हसबे, सतिशचंद्र प्रभु,नेमीचंद भुरेवाल, शितलप्रसाद पांडे, प्रभुलाल गोमतीवाले,सय्यद इम्रान,भाजपा शहर उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र भोसले,ममता कोंडयाल,युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल खरे, नगरसेवक सुनिल पवार,योगेश लहाने,ओबीसी मोर्चा शहरध्यक्ष सोमेश काबलिये, मनोज बिडकर, सचिन मोहता,विकास कदम,मनोज इंगळे, अमरदिप शिंदे, रामप्रसाद मुदडा,डोंगरसिंग साबळे,दत्ता जाधव, नदीम कुरेशी, आनंद झारखंडे,करण झाडीवाले, लक्ष्मण वर्मा,सेवकराम नारीयलवाले,शेखर बुंदले,पवन झुंगे,लक्ष्मण खाडे, योगेश सामलेटी,दिलीप दाभाडे,संजय माधवले,अकबर परसुवाले यांच्यासह जालना शहरातील,शक्तीकेंद्र विस्तारक, शक्तीकेद्र प्रमुख व पदाधिकरी मोठया संख्येने उपस्थीत होते.