केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या अथक परीश्रमामुळे भारतीय रेल्वेची कामे प्रगती पथावर – सौ. देशपांडे

71

जालना । प्रतिनिधी – भारत देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे हे रेल्वे मंत्री झाल्यापासून त्यांनी देशामध्ये रेल्वे खात्यात अमुलाग्र बद्दल केला असून त्यांच्या अथक परीश्रमामुळेच व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेची नवीन कामे प्रगतीपथावर असल्याचे मत भाजपा सास्कृतिक सेल जिल्हाध्यक्षा सौ.शुभांगीताई देशपांडे भारतीय रेल्वे दिनानिमित्त जालना रेल्वे स्थानकांवर रेल्वे कर्मचार्‍यांच्या सत्कार व भेटीप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी बोलतांना सौ.शुभांगीताई देशपांडे म्हणाल्याकी 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी बोरीबंदर ते,(व्हिक्टोरिया टर्मिनस) आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथपर्यंत धावली.तो तिचा प्रवास लाकडी रुळ ते लोखंडी रुळ.लाकडी डबे ते आताचे अद्ययावत डबे,तीन डब्यांच्या पासून सुरू झालेला प्रवास, ते आता मेट्रो,आणि येणार्‍या काळात जपानच्या मदतीने भारतात धावणारी बुलेट ट्रेन ,एवढा पावणेदोन दशकांचा प्रवास आहे.जगात भारतीय रेल दुसर्‍या क्रमांकावर आहे. अशा ह्या अफाट पसरलेल्या,सर्वत्र जाळे असलेल्या रेल्वेच्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदी असलेले श्री.रावसाहेब दादा दानवे आहेत ,ह्याचा यांचा जालना जिल्हयातील जनतेला अभिमान आहे.ना.दानवे दादा रेल्वे मंत्री झाल्यापासून लक्षणीय अशा सुधारणा मराठवाड्यातील रेल्वेमध्ये झालेल्या आहेत .आमचे जालना रेल्वे स्टेशन कात टाकते आहे. पीट लाईन असो जालना ते पुणे ही गाडी असो, रेल्वेचे विद्युतीकरण असो, अशी सगळीच कामे प्रगतीपथावर आहेत .ना.दानवे दादा रेल्वे राज्यमंत्री आहेत याचा जालना जिल्हयातील जनतेला खूप अभिमान आहे. भाजपा सास्कृतिक सेलच्या वतीने आज रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे दिवस साजरा केला. या निमित्ताने रेल्वेचे को- पायलट श्री.राहुल तुपे, श्री.प्रभुदास पैठणे,स्टेशन मास्तर. श्री.सुरेश भोपते तिकीट कलेक्टर. श्री. शेख नूरह्यांचा सत्कार केला.
जनशताब्दी गाडीला भेट दिली..
आजच्या रेल दिवसाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, रावसाहेब दानवे यांना, त्यांच्या संपूर्ण टीमला ,सर्व रेल्वे प्रशासनाला, अधिकारी वर्ग, सर्व तंत्रज्ञ, कामगार, सफाई कामगार, कुली, सर्व रेल्वे प्रवासी, रेल्वेच्या संपूर्ण जाळ्यामध्ये आपुलकीने एकत्रपणे काम करून, भारतीय रेल्वेचे जगात दुसर्‍या क्रमांकावर नाव नेणार्‍या भारतीय रेल्वेशी सलग्न असणार्‍या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा सास्कृतिक सेलच्या कार्यकारणी मधील विद्याताई देशमुख, अमृता धावणे, सौ. रोहिणी टाकळकर, सौ. दीपा बिनीवाले, या उपस्थित होत्या.