परतुर रेल्वे स्थानकात बसविली महामानवाची प्रतिमा

20

परतूर । प्रतिनिधी – रेल्वे स्टेशन येथे साउथ सेंट्रल रेल्वे, नांदेड मंडल, परतूर च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण नांदेड डिव्हिजनल सेक्रेटरी यांच्या परवानगीने सीनियर तिकीट बुकिंग क्लार्क गाडेकर साहेब, नांदेड मंडळ जूनियर इंजि. अशोक साळवे, रेल्वे स्टेशन मास्टर अंकुर चौधरी,माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया या मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले याप्रसंगी गटनेते बाबुराव हिवाळे,लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, शिवाजी डोळस, तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे, शहराध्यक्ष राहुल नाटकर,प्रदीप साळवे,विकास वेडेकर, पत्रकारअशोक ठोके, गौतम पाडमुख, दीपक हिवाळे, आदी उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बसवण्या करिता सर्व आजी-माजी रेल्वे कर्मचारी यांनी सहकार्य केले विशेष सहकार्य आरसीसी व पंचशील मित्र मंडळ परतुर यांनी केले.