डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान आणि वह्या व पुस्तके वाटप, पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धू कणकुटे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

32

जालना | प्रतिनिधी-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिर आणि शालेय साहित्यासह पाणी वाटपाचा कार्यक्रम घेवून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी आरोग्यमंत्री तथा आ. राजेश टोपे, माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, उद्योजक घनश्याम गोयल, भास्कर आंबेकर, भास्कर दानवे, अभिमन्यु खोतकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी भंते कश्यपली यांच्या हस्ते वह्या व पुस्तके वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भीम क्रांती पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धू कणकुटे यांच्या वतीने व रक्त संकलन जालना ब्लड बँकच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी मुख्य आयोजक सिद्धू कणकुटे म्हणाले की, कोरोना काळानंतर रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदान करून सहकार्य करावे. आणि महामानवाची जयंती ज्यांनी आयुष्यभर शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला त्यांच्या जयंतीनिमित्त असा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतला पाहिजे असे कणकुटे यांनी सांगीतले.