जेष्ठ साहित्तीक जयसिंग वाघ यांचा शिरसोली येथे नागरी सत्कार संपन्न

24
जळगाव : जेष्ठ साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांचा शिरसोली तालुका जळगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय बौध्द महासभा, शिरसोली शाखे तर्फे नागरी सत्कार करण्यात आला .
       या प्रसंगी जयसिंग वाघ यांना शाल , बुके व सन्मानपत्र भारतीय बौध्द महासभेचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार , सुनील तायड़े , बाबूराव इंगळे , पंडित वानखेड़े यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, या प्रसंगी वाघ यांच्या पत्नी सुनंदा वाघ या सुद्धा हजर होत्या .
        नागरी सत्कार करण्या मागील हेतु विशद करतांना सुनील तायड़े यांनी सांगितले की जयसिंग वाघ यांनी साहित्याच्या क्षेतात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली असून व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे , त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा प्रभावी राहिले असून त्यांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे , त्यांच्या अभ्यासपूर्ण लिखानातून व भाषणातून अनेक नविव पैलु दिसून येतात , त्यांच्या साहित्तीक व सामाजिक कार्याचा उचित गौरव व्हावा म्हणून त्यांचा आम्ही नागरी सत्कार करित आहोत .
         आनंद ढीवरे , रविंद्र वानखेडे  डॉ. सोपान पाटिल यांनी वाघ यांच्या विविध कार्याची माहिती दिली , कार्यक्रमाचे अध्यक्ष बी . एस . पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की जयसिंग वाघ हे गेली ४० – ४५  वर्षां पासून समाज प्रबोधन करित आले आहेत , अत्यंत अभ्यासपूर्ण व अतिशय रोखठोक मुद्दे मांडून ते नवा विचार मांडत असतात , त्यांचा हा नागरी सत्कार अभ्यासक लोकांना नवी दिशा देईल .
         सत्कारास उत्तर देताना वाघ यांनी सांगितले की समाजात अनेक लोक  खूप अभ्यासु आहेत पण ते लिहित नाहीत , काही लोक खूप अभ्यास करुन लिहितात पण ते भाषण करित नाहीत त्या मुळे ती माणसं जनते समोर येत नाहीत , मी फार  मोठा अभ्यासक नाही , फारमोठा लेखक नाही पण मी कमी अधिक प्रमाणात अभ्यास , लेखन व भाषण करीत असतो त्या मुळे आम्बेडकरी अनुयायी माझा व माझ्या सारख्यानचा सत्कार करीत असतात , आपण माझा सत्कार करुन माझ्यावर अधिक जबाबदारी टाकली आहे असे मी मानतो व ती जबाबदारी पार पाडन्याचा मी प्रयत्न करेल , असे विचार व्यक्त केले .
        कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध , शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षि शाहु महाराज , बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
       सन्मानपत्राचे वाचन सुनील तायड़े , प्रास्ताविक बाबूराव इंगळे , सूत्रसंचालन पंडित वानखेडे , परिचय रविंद्र इंगळे , आभार संतोष दाभाड़े यांनी केले . कार्यक्रमास गावकरी मोठ्या संखेने हजर होते.
       कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता  शैलेश सोनवणे , हेमंत भालेराव , भीमराव इंगळे , देवानंद साळवे , सिद्धार्थ खराटे , रमेश मानसरे , वंदना इंगळे , कविता सोनवणे , संघमित्रा तायड़े , लीलाबाई भालेराव , मंगला इंगळे , ज्योती इंगळे , पुष्पा वानखेड़े यांनी परिश्रम घेतले .