करूणा बुध्द विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम

12

जालना | प्रतिनिधी – शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर रेल्वे स्टेशन जालना येथील करूणा बुध्द विहारात मानाची जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती बौध्द समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी दिली.
दि. 10 एप्रिल रोजी परिसर स्वच्छता व विहाराच्या परिसरातील रंगरंगोटी करण्यात आली. परिसरातील पुर्णाकृती पुतळ्यास स्वच्छ धुवून घेण्यात आले व भिम स्तुती घेतली. दि. 11 रोजी बौध्द समाज सेवा संघाच्या बाल संस्कार केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनकार्यावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. दि. 12 एप्रिल रोजी परिसरातील युवकांची गीतगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. दि. 13 रोजी रात्री फटाक्यांची आतषबाजी रंगीबेरंगी करण्यात येईल. दि. 14 रोजी दुपारी 3 वाजता करूणा बुध्द विहार येथुन ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुक आणि लेझीम पथक, मैदानी खेळ खेळत जयंती मिरवणुक निघेल. ही मुख्य मिरवणुक असून पाणीवेस या ठिकाणी मानाच्या गाडीच्या पाठीमागे शहरातील ईतर मिरवणुका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सजविलेले रथ सामिल होतील. सर्व फुले शाहु आंबेडकरी समाजप्रेमींनी बंधु-भगीनीं, युवक-युवतींनी शिस्तीत कुठल्याही प्रकारचे व्यसन न करता शांतता सुव्यवस्था व मिरवणुका व्यवस्थीत पार पडतील याची काळजी घ्यावी. मुख्य मिरवणुकीचे पुष्पहाराने स्वागत आदरणीय जिल्ह्याधिकारी किंवा त्यांनी नियुक्त कर्मचारी व पोलीस अधिक्षक हे विधिवत पुजा करून मुख्य मिरवणुकीच्या पाठीमागे सर्व मिरवणुकीचे रथ सिस्तबध्द निघतील.
तरी सर्वांनी मिरवणुकीत शांतता सुव्यवस्था अबाधीत राखुन कुणाच्याही धार्मीक भावना दुखावणार नाहीत असे वर्तनल ठेवुन नशापाणी न ठरता मिरवणुकीने सामील व्हावेत असे जाहीर आवाहन प्रभाकरराव घेवंदे दिनकर घेवंदे, मधुकर घेवंदे, मुख्य मिरवणुकीचे अध्यक्ष जितेंद्र सरकटे, विनोद खरात, सुमेध गरड, घेवंदे, सुमेध घेवंदे, राहुल सातपुते, अमित मोरे आदींनी केले आहे.