जालना :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील कीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला • शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणान्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत “शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार”, “उत्कृष्ट क्रीडामार्गदर्शक पुरस्कार”, -शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)”, “शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार”, “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)” असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. शिछपु २०२०/प्र.क्र. २३/क्रीयुसे-२, दि.१४ डिसेंबर, २०२२ मधील नियम क्र.४ व नियम क्र.५ (३) नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award) टॅब मध्ये दि. १३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि. १३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीपर्यंत संचालनालयाच्या [email protected] या ई-मेल आयडीवर विहित नमुन्यात कळविण्यात याव्यात, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. विहित नमुना संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या (Latest News) मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या आक्षेप / हरकतींचे निराकरण/ स्पष्टीकरण दि. १५ ते १७ एप्रिल, २०२३ या कालावधीत संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award) टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. असे क्रीडा विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.