जालना | प्रतिनिधी – जालना येथील प्रसिध्द मल्ल मनचरण सले यांनी दि. 8 ते 10 एप्रिल दरम्यान चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय फ्री स्टाइल 19 वर्ष वयोगटातील 125 किलो वजन गटात आपल्या ताकतीच्या व दमदार खेळाच्या बळावर प्रतिस्पर्धी मल्लाला आसमान दाखवत कांस्य पदक पटकावले आहे.
या यशाबद्दल जालना विधानसभेचे आ. कैलास गोरंट्याल यांनी पैलवान मनचरण सले यास पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख मेहमूद, माजी नगरसेवक जीवन सले, विष्णु वाघमारे, डॉ. भिक्कुलाल सले, सरपंच अरुण घडलींगे, शिवप्रकाश चितळकर, चरण सले, संतोष सले, माधव बनसोडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.