मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या जयंती निमित्ताने आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मंत्रालय मुंबई येथे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहसचिव दिनेश डिंगळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जयंती निमित्ताने मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करून रांगोळी टाकण्यात आली होती. राज्यभरात सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.