जालना | प्रतिनिधी – जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमाचे दि. 14 एप्रिल 2023 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता सोनी रेसिडेन्सी, श्रीहरी नगर, नवीन मोंढा रोड, ता. जि. जालना या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याच्या दिवशी हजारो भक्तगण उपासक दीक्षा घेणार असल्याची माहिती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जालना जिल्ह्याच्या वतीने देण्यात आली आहे.
विज्ञानाने केली क्रांती परंतु अध्यात्मा शिवाय नाही मन:शांती यानुसार विज्ञान आजवर खूप मोठ्या प्रमाणात क्रांती करत असताना भौतिक सुखात माणूस हरवून जात असून या धावपळीच्या युगात माणूस यंत्रवत बनत चालला आहे. यामुळे मन शांती अध्यात्मिक सुखाचा अभाव दिसून येतो, मनुष्य जीवन हाताश निराश झालेले आढळून येते, यासाठी श्री संप्रदाय जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळातर्फे अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, या प्रवचन दर्शन सोहळ्याच्या माध्यमातून संस्थान तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यात गरजू होतकरू महिलांना घरघंटी वाटप जनावरांसाठी चारा वाटप शैक्षणिक साहित्य यांचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप रक्तदान वैद्यकीय उपक्रम शेतकर्यांसाठी शेती साहित्य वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे प्रवचन दर्शन सोहळा कार्यक्रमात जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज आपल्या अमृतमय वाणीतून प्रवचनातून डोळे विज्ञानवादी मन अध्यात्मावादी आणि बुद्धी वास्तवादी ठेवा या त्रिसुत्रीचा वापर करून अशा प्रकारे जीवनात सुख शांती समाधान स्थैर्य प्रगती साधता येते व आपल्यातील रजगुण कमी करुन सत्वगुण वाढविते ज्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढतो यावर मार्गदर्शन करणार आहे. दिवसभर चालणारे या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पालखी सोहळा श्रींचे पादुका आगमन उपस्थित भक्तगण यांच्या हस्ते गुरुपूजन श्री लीलामृत ग्रंथाचे पारायण आणि प्रवचन उपासक दीक्षा व दर्शन सोहळा सांगता समारोह पुष्पवृष्टीने होणार आहे तसेच भक्तगना साठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील शिष्य साधक भक्तगण भाविक सर्व नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जालना जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.