जालना- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जालना शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 14 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम- उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भास्कर अण्णा रत्नपारखे यांनी सांगितले की, 2023 च्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष जालना शहराचे आमदार कैलास गोरंट्याल हे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम- उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जालना शहरात सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री आमदार राजेश टोपे हे उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री अर्जूनराव खोतकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी नगराध्यक्ष सौ. संगिताताई गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, उद्योजक घनश्यामदास गोयल, कैलास लोया,काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील, दीपक हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राख, काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल, नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, भीम महोत्सवाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, माजी नगराध्यक्ष श्रीमती पार्वताबाई रत्नपारखे, भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, एसबीआय बँकेचे व्यवस्थापक संजय पवार,रविंद्र चोरपगारे, भाऊसाहेब नरके, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक संजय रामोड आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून जालना येथील ज्येष्ठ सामाजिक नेते ड. बी. एम. साळवे, रिपाइंचे नेते ड. ब्रम्हानंद चव्हाण, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे,ज्येष्ठ सामाजिक नेते ड. शिवाजीराव आदमाने, रिपाइंचे मराठवाडा सचिव सुधाकर रत्नपारखे, ज्येष्ठ सामाजिक नेते गुलाबराव पांजगे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कौशल्याबाई खरात, श्रीमती सावित्रीबाई पगारे, ज्येष्ठ सामाजिक नेते रशीद पहेलवान, इकबाल पाशा, भीमशक्ति सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रमोदकुमार रत्नपारखे, भीम कायदा सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास डोळसे,जयभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, तहसीलदार छाया पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉ. आशिष राठोड, ज्येष्ठ नगरसेवक महावीर ढक्का, विनोद रत्नपारखे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र रत्नपारखे, कुणबी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष ड. राम कुर्हाडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते नारायण चाळगे,उद्योजक संजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ते फेरोजलाला तांबोळी, माजी नगरसेवक गणेश राऊत, ड. राहुल हिवराळे, काँग्रेसचे जालना शहराध्यक्ष शेख महेमूद, जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष विपुल रॉय, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रत्नपारखे, जयभीम सेनेचे सचिव रोहिदास गंगातिवरे, साईनाथ चिन्नादोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुदामराव सदाशिवे,तांदुळवाडीचे सरपंच अण्णासाहेब चित्तेकर,युवा सेनेचे शहर प्रमुख योगेश रत्नपारखे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनील खरे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चत्रे,ड.दशरथ इंगळे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर उघडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शाह आलमखान,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अकबर इनामदार, सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे, मुस्तकीम हमदूले, शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे शहरप्रमुख अब्दुल सगीर, शासकीय कंत्राटदार सागर बर्दापूरकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती मनकर्णाबाई डांगे, ऐक्यवादी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रत्नपारखे, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती मालनबाई दाभाडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. नंदाताई पवार, सामाजिक कार्यकर्त्या ड. कल्पना त्रिभुवन, शिवसेनेचे जालना तालुका प्रमुख पंडित भुतेकर,शासकीय कंत्राटदार सुरेश रत्नपारखे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश डोळस, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे,सामाजिक कार्यकर्ते वाजेदखान, रिपाइंचे युवा नेते अमोल रत्नपारखे, माजी नगरसेवक अरूण मगरे, निखिल पगारे, शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णु पाचफुले,सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपारकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, छत्रपती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील रत्नपारखे, सामाजिक कार्यकर्ते ड. बबन मगरे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हिवाळे, रिपब्लिकन पँथरचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, प्रभाकर घेवंदे,बदनापरचे सभापती भरत मदन, भाजपचे नेते भाऊसाहेब अवघड, शिवसेनेचे शहर संघटक दिनेश भगत, उद्योजक राहुल रत्नपारखे, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद साळवे, विद्रोही पँथरचे अध्यक्ष कपिल खरात, विद्रोही पँथरचे सचिव संदीप साबळे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद, माजी नगरसेवक शेख शकील, मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे, सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे, माजी नगरसेवक विजय जाधव, माजी नगरसेवक शशिकांत घुगे, माजी नगरसेविका संगिता पांजगे, सहकार सेलचे प्रदेशाध्यक्ष फकिरा वाघ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. सत्संग मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोपान पाडमुख, माजी नगरसेवक काशीनाथ मगरे, सामाजिक कार्यकर्ते विजय घुमारे, कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरूण सरदार, माजी नगरसेवक वैभव उगले, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर काकड, युवा सेनेचे शहराध्यक्ष राजू सलामपुरे, माजी नगरसेवक ड. रोहीत बनवसकर, प्राचार्य डॉ. राजकुमार म्हसके, डॉ. दादासाहेब गजहंस, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने, बसपाचे माजी अध्यक्ष ड. जयकुमार भालमोडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खरात, शासकीय कंत्राटदार महेंद्र रत्नपारखे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, ड. मदन पंडित, माजी नगरसेवक बाबुराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश निकम, सामाजिक कार्यकर्ते शेख मन्नान,जलसम्राट फोरम सोशल ग्रुपचे अध्यक्ष प्रविण रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, नाट्यलेखक सर्जेराव खरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ. रेखाताई तौर, ड. रेखाताई कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश चांदोडे, सामाजिक कार्यकर्ते बापू साळवे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता घुले, राजेंद्र साळवे आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमानंतर भीमशाहीर मेघानंद जाधव यांच्या बुद्ध- भीमगितांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सांयकाळी 6 वाजता जालना शहरातील सुभाष चौक येथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीत शहरातील विविध भागातील जयंती उत्सव समितीचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.
जालना शहरातील तमाम नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास गोरंट्याल, अध्यक्ष भास्कर अण्णा रत्नपारखे, सचिव संतोष खरात, कार्याध्यक्ष शेख इब्राहिम, उपाध्यक्ष मनोज इंगळे, प्रदीप रत्नपारखे, कोषाध्यक्ष शरद डोळसे,दीपक रत्नपारखे, सहसचिव अनिल रत्नपारखे, दत्ता आसलकर,रावसाहेब रत्नपारखे, निलेश रत्नपारखे आदींनी केले आहे.
भीम जयंती निमित्ताने 132 ग्रंथाचे वाटप करणार
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम- उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त मस्तगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समिती व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ संपदेचा प्रसार व प्रचार व्हावा, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर हे समजावेत, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 ग्रंथाचे वाटप करण्यात येणार आहे.