जालना । प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नागेवाडी जालना येथे आलेली असतानाही सुद्धा शेतकर्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा न करता बँक व्यवस्थापकाने शेतकर्यांचे खाते हॉल्ट करून शेतकर्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी आ.नारायण कुचे यांच्याकडे धाव घेतली.
शेतकर्यांच्या प्रश्नाची व मागणीची आ.कुचे यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जालना जिल्ह्यातील बँकेच्या ढिसाळ कारभाराची कारभाराची तक्रार केली व आ.नारायण कुचे व जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी तात्काळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नागेवाडी येथे प्रत्यक्ष बँकेत जाऊन शासनाच्या शासन निर्णय दिनांक 13/05/2015 अन्वये नियमाप्रमाणे शेतकर्यांच्या खाते हॉल्ट न करता ते शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान जमा करण्याच्या सुचना आ.नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्यासह जिल्हा निबंधक जालना व तहसीलदार छाया पवार, जालना यांना सुचना दिल्या. जालना जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांच्या अडवणूक करणार्या बँक व्यवस्थापक शेतकर्यांचे अतिवृष्टीचे अनुदान पिक कर्जात कपात करू नये व शेतकर्यांचे खाते हॉल्ट करू नये. शेतकर्यांच्या खाते हॉल्ट करणार्या बँक व्यवस्थापक शासनाच्या निर्णयाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी आ.नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे केली आहे. शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान किसान सन्मान निधी जमा असलेल्या खात्यासह हॉल्ट न लावता बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून शेतकर्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याची मागणी आ.नारायण कुचे यांनी केली आहे.