जालना | प्रतिनिधी- जालना शहरात महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त जालना नगर पालिकेच्या आवारातील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना लाडुचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
नगर पालिकेच्या समोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समाज कल्याण आयुक्त आमित धवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आ. राजेश टोपे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, उपमुख्याधिकारी महेश शिंदे, भास्कर अंबेकर, बाबासाहेब वानखेडे, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, नंदकुमार जांगडे, जालना नगर परिषदेचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर, बाबुराव पवार, रमेश मुळे,गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, शंकर सातपुते, लक्ष्मण ईधाटे, बंडु कुदळे, रामेश्वर खांडेभराड, दशरथ तोंडुळे, बाळासाहेब तिडके, दगडु बडवे, निलेश वानखेडे, नितीन वानखेडे,सुदामराव सदाशिवे, सुरेश रत्नपारखे, रामभाऊ तायडे, शिवलाल घाडगे, महेंद्र शिंगणे, दत्ता खांडेभराड, ज्ञानेश्वर धानुरे, अरूण वानखेडे, अशोक टपरे, बाबु दास महाराज, अनिल वाघमारे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांची उपस्थिती होती. मंजुळा घायाळ, दिपाली झीने, ऋतुजा खरात यांनी सुंदर रांगोळी पुर्णाकृती पुतळ्यासमोर काढली होती.
भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी
महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने द्यावा अशी मागणी जालना येथील बाबासाहेब वानखेडे यांनी केली आहे.