मारवाडी समाजाचे जालना येथे रविवारी महाअधिवेशन समाज बांधवांनी उपस्थित राहावे- महेश भक्कड

16

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलन व महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 16 एप्रिल रोजी जालना येथे मारवाडी समाज महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते समाजातील मान्यवरांना महाराष्ट्र भूषण, जिल्हा भूषण, जालना शहर भूषण आदी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जालना मारवाडी युवा मंचचे नूतन अध्यक्ष महेश भक्कड यांनी केले आहे.
हे महाअधिवेशन जैन विद्यालयाच्या स्व. हिरालाल अग्रवाल अधिवेशननगरीत होणार आहे. सकाळी 11 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आशीर्वचन देण्यासाठी जगन्नाथपुरी येथील जगद्गुरु प. पू. शंकराचार्य अधोक्षानंदजी, आंतरराष्ट्रीय वक्त्या प. पू. साध्वी पुष्पाशास्त्री उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी संमेलनाचे क्रांती अध्यक्ष राज पुरोहित हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मारवाडी समाजाचे भीष्मपितामह तथा माजी मंत्री सुरेश जैन, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार कैलास गोरंट्याल, मारवाडी संमेलनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोवर्धन गादोडिया, खा. गजानन कीर्तिकर, मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड, आ. प्रशांत बंब, मारवाडी संमेलनचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवकुमार लोहिया, आ. राजेंद्र पाटणी, आ. बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ. जयप्रकाश मुंदडा, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, मारवाडी युवा मंचचे प्रांतीय अध्यक्ष उमेश पंचारिया आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 2 वाजता खुल्या अधिवेशनात टुटते परिवार.. बिखरता समाज.. बढते तलाक… राजनीति में पीछेहाट.. आखिर क्यो..? या विषयावर विचारमंथन होणार आहे. अधिवेशनाच्या समारोप समारंभात मान्यवरांना विविध पुरस्काराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात समाजातील बंधू – भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जालना मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष महेश भक्कड, सचिव डॉ. पीयूष होलानी, उपाध्यक्ष चेतन बोथरा, कोषाध्यक्ष रमेश मोदी यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.