जालना- जालना विधानसभा मतदार संघातील विविध कार्यकारी सोसायटी नंदापुर, कडवंची, अंभोरेवाडी, गवळी पोखरी, बोरखेडी सहकारी सोसायटी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पंचायत समिती सदस्य कैलास उबाळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय झाल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी विजयी उमेदवार यांचा सत्कार करून गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या व गावच्या विकासासाठी भरवी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी विजयी उमेदवार श्री.कैलास पंडितराव उबाळे, श्री.अशोक दशरथ आंबिलवादे, श्री.सारंगधर अच्युतराव उबाळे, श्री.सोनाजी भानुदास खरात, श्री.गंगाधर बारीकराव उबाळे, श्री.धनराज किसनराव क्षीरसागर, श्री.सुनील बापूराव अंभोरे, नर्मदाबाई काशिनाथ उबाळे, मंदाकिनी सखाराम उबाळे यांची उपस्थिती होती.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर (आबा) दानवे, ना.दानवे यांचे स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, नागेश अंभोरे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.