परतूर । प्रतिनिधी – परतूर येथील आगर प्रमुख दिगंबर जाधव यांच्या नियोजनात उत्पन्न च्या बाबतीत मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्रात परतूर आगर एक नंबर वर आल्या बद्दल त्यांचा सर्व कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यबदल त्यांना जालना येथे विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून पद उन्नती देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्थानक प्रमुख सुषमा साळवे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नव्याने रुजू झालेले आगार प्रमुख श्री.वागदरीकर
सहशिक्षाक श्याम कबाडी,कैलास खंदारे, रामराम घुगे उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. जाधव म्हणाले की, सर्व चालक,वाहक,इतर सर्व यांच्या सहकार्याने आपण आपल्या आगाराचे उत्पन्न महाराष्ट्रत प्रथम क्रमांकावर हा आपला खूप मोठा गौरव आहे. या रामेश्वर वरखडे, जगदीश बरसाले, मुरलीधर राऊत , मधुकर गोडबोले, जोशी साहेब,श्री. आढे , योगेश काळे, गजानन चिंचाने,सुरेश मसळलकर,अनिल काळे,बळीराम नवल, सचिन कंगने,रमेश निर्वळ,सुभाष बरकुले आदी उपस्थित होते.