चैत्र पौर्णिमेला जोगेश्वरी मातेची यात्रा हनुमान जन्मोत्सव व कुस्तीची रंगली दंगल देवीच्या सोंगाचा मान मिळाला परीहार कुटुंबाला

32

टेंभुर्णी । जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील कोनड बु.येथिल नवसाला पावणारी जोगेश्वरी मातेची ख्याती सर्वदुर पसरलेली असुन यावर्षी 2 एप्रिल चैत्र पौर्णिमेपासुन ते 6 एप्रिल हनुमान जयंती पर्यंत भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .2 एप्रिल पासुन सुरु झालेल्या या महोत्सवात पाच दिवस नंदी, खंडोबा, सरस्वती, परी, लवकुस, राम लक्ष्मण, रावण, मारीस, प्रधानजी, सेनापती, इंद्रजित यासह विविध देवी दैवतांचे शंभरच्याही वरती सोंग निघाले तर शेवटच्या दिवशी जोगेश्वरी मातेचे सोंग निघाले होते हे देवीचे सोंग घेण्याचा मान परीहार कुंटुंबाला असुन एकनाथ परीहार यांचे कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासुन सोंग घेत आहे.ही परंपरा अडीचशे वर्षाची असुन या यात्रा महोत्सवात सर्व धर्मियांची उपस्थिती असते तसेच लग्न होवुन सासरी गेलेल्या लेकीबाळी,कामासाठी व्यावसायासाठी तथा नौकरीसाठी बाहेर गेलेले नागरीक या दिवशी आवर्जुन हजेरी लावतात तथा कबुल केले नवस देवीपुढे फेडतात.
चैत्र पोर्णिमेला या ठिकाणी रात्रभर जागर होतो यात रात्रभर दशावतार सोंगाबरोबरच रामरावण आख्यायिका नवमीच्या रुपात सादर केली जाते.त्याचप्रमाणे नंदीचे सोंग पाहण्यासाठी भक्तगण गर्दी करतात सकाळी जोगेश्वरी मातेच्या सोंगाची स्वारी निघते याचा मान एकनाथ परीहार(फौजी)यांना देण्यात आलेला असुन परंपरेने ठरलेल्या जागेवरुन मारुती मंदीरापर्यत मिरवणुक निघाली यावेळी देवीला हिरवा चुडा आणि हिरवे पातळ चढविल्या जाते तर गावातील महीलाभगीनी देवीची पुजाअर्चा करुन नवस फेडतात तर गेल्या दहा वर्षापासुन वरुड बु.येथिल प्रतिष्ठीत व्यापारी प्रकाश खण्डेलवाल हे संपुर्ण महाप्रसादाचा सर्व खर्च देवीच्या चरणी अर्पण करतात दुपारी 4 वाजेपासुन महाप्रसाद सुरु झाला व यानंतर परंपरेनुसार वेड्या नवरदेवाचे सोंग निघते हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे त्या दिवशी मारुती मंदीराच्या प्रांगणावर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी झाली.
सकाळी महीलांनी आपल्या नवसाच्या बालकांना देवीच्या मंदिरावर आंघोळी घालून लिंबाचा पाला चढवित बालकांची देवीला प्रदक्षिणा घातली यावेळी जोगेश्वरी माते की जय ,आंबा भवानी की जयच्या जयघोषाने परीसर दणाणुन गेला होता.तर भाविक आपआपल्या पद्धतीने नवस फेडतांना दिसुन आले दिवसभर यात्रा भरल्यानंतर दुपारी चार वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नागरीकांनी आस्वाद घेतला त्यानंतर त्याच सकाळी पाच पर्यंत रामनवमीचा कार्यक्रम संपन्न होवुन विविध दैवतांचे सोंग निघाली व सकाळी सहा वाजता जोगेश्वरी मातेची भव्य मिरवणूक गावभर देण्यात आली या मिरवणुकीला ग्रामस्थासह पंचक्रोशितील नागरीकांचा मोठा प्रतिसाद बघावयास मिळाला .
दुसर्‍या दिवशी जंगी कुस्त्यांचे सामने झाले यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील मल्ल याठीकाणी उपस्थित झाल्याने कुस्तीचे मैदानही हाऊसफुल्ल झाले होते .यासाठी रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिह परीहार, माजी सरपंच एकनाथ परीहार,सरपंच अशोक पवार,उपसरपंच ईश्वर परीहार यांच्या वतीने प्रथम बक्षीस 31 हजार रुपये,दुसरे 21 हजाराचे बक्षीस शाहीर नानाभाऊ परीहार,गणेश परीहार,एकनाथ विठोबा परीहार,रामेश्वर परीहार,नारायण रिंढे,भिमराव नागरे, तिसरे 15 हजाराचे बक्षीस नामदेव परीहार,बिंदेसिंग परीहार,कट्यारसिंग परीहार,नारायण महाले यांच्या वतीने देण्यात आले तर चौथे 11 हजाराचे बक्षीस राजेंद्र परीहार,दत्तात्रय परीहार,सचिन परीहार,शंकर दांडगे यांच्याकडून तर पाचवे बक्षीस जि.प.प्रशाला कोनड बु.व ग्रामसेवक राजेंद्र कंकाळ सहावे 5 हजाराचे बक्षिस प्रशांत परीहार,सुरेश टोलमारे,गजानन परीहार श्रीकृष्ण परीहार यांनी दिले यासह 4 हजार रु.,3 हजार रु व 2हजार 100 चे ग्रामस्थांनी विजयी पेहलवानांना दिले.यासाठी ज्यांनी बक्षीस दिले त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरण होते प्रथम बक्षीस रामेश्वरचे चेअरमन विजयसिंह नाना परिहार, माजी सरपंच एकनाथ परीहार, सरपंच अशोक पवार उपसरपंच ईश्वर परिहार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी विजयसिह परीहार,संस्थानचे अध्यक्ष शाहीर नानाभाऊ परिहार उपाध्यक्ष गणेश परिहार कुस्त्यांचे प्रमुख बिदेसिंग परिहार व रामेश्वर परिहार ,पंढरीनाथ परीहार,सुभाष परीहार,ग्रामसेवक राजेंद्र परीहार,इंदरसिंग परीहार,संजय परीहार,योगेश परीहार,रामदास परीहार,विजय इंगळे,भाऊराव बकाल,रमेश वायाळ,सुरेश परीहार,पूरुषोत्तम गाडेकर,हरीभाऊ बकाल,रमेश तुपे,रामलिंगआप्पा घोडके,काशिनाथ परीहार,विलास परीहार,कैलास परीहार,नितिन परीहार,धोडनआप्पा घोडके,रामेश्वर बकाल,नामदेव शेळके,ज्ञानदेव सातपुते,सारजुबा शेळके,सुनिल परीहार,प्रकाश शेळके,राजेंद्र वायाळ ,दिलिप वायाळ,दिलिप परीहार,एकनाथ परीहार,महादु परीहार,विठोबा गायकवाड,गजानन बावणे यांच्यासह आदी नागरीकांनी रोख स्वरुपात कुस्ती पैलवानावर बक्षिसांचा वर्षाव करीत त्यांचे बनोबल वाढविले यात प्रथम 31 हजाराचे बक्षीस रोहीलागडचे पैहेलवान जगदीश राजपुत यांनी पटकावले,21 हजाराचे दुसरे बक्षिस जयसिंग राजपुत रोहलागड,तिसरे 15 हजाराचे बक्षिस अरुण राजपुत हे देखील रोहलागडचे पैहेलवान यांनी पटकावले तर चौथे 11 हजाराचे बक्षिस जवखेडा ठोंबरे येथिल प्रमोद काळे व पाचवे 7 हजाराचे बक्षिस आनवा येथिल कृष्णा हजारे यांनी पटकावले आहे. यावेळी ही कुस्तीची दंगल बघण्यासाठी कोनड बु.सह तालुक्यातील विविध भागातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पै. यांना 31 हजाराचे बक्षीस देतांना चेअरमन विजयसिह परीहार,एकनाथ परीहार सरपंच अशोक पवार,उपसरपंच ईश्वर परीहार.