जालना शहरातील युवकांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश

92

जालना  प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष आनंद झारखंडे यांच्या सहकार्याने जालना शहरातील असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये दि.०९ एप्रिल २०२३ रोजी, भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे जाहीर प्रवेश केला.

जालना शहरातील साईनाथ नगर, मंठा चौफुली, नळ गल्ली, सुखशांती नगर भागातील श्री.किरण धोकडे, श्री.शंकर नागरे, श्री.स्वप्नील गीते, श्री.राजेश राठोड, श्री.जगदीश ताठे, श्री.सुरेश धोकडे, श्री.अक्षय धोकडे, श्री.मनोज धोकडे, श्री.प्रभूअप्पा धोकडे, श्री.प्रकाश धोकडे, श्री.नागेश धोकडे, श्री.नरेश लाडे, श्री.राजू कंठाळे, श्री.अक्षय पातुरकर, श्री.सुनील केंद्रे, श्री.संतोष राठोड, श्री.उमेश दळवी, श्री.अमोल लाकड, श्री.ज्ञानेश्वर राठोड, श्री.विनायक आडे, श्री.राजू राठोड आदींनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या हस्ते प्रवेश करताना उपस्थित युवकांनी सांगितले की, जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी यापूर्वी अनेकवेळा मदत केली असून, त्यांच्या या विकास कामांच्या प्रभावामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रवेश केलेल्या युवकांना मार्गदर्शन करताना भास्कर (आबा) दानवे म्हणाले की, भाजपा हा पक्ष तळागाळातील जनतेसाठी काम करणारा पक्ष असून, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वत: या ब्रीदवाक्यानुसार यशस्वी वाटचाल करणारा विकासाच्या प्रक्रियेत तळागाळातील लोकांना सामावून घेऊन भारताला जगात मानाचे स्थान मिळवून देणारा भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत आहे, पक्ष संगठन वाढवून केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करावा, असेही दानवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीस अतिक खान, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, ना.दानवे यांचे स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, विकास कदम, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज पाचफुले, डोंगरसिंग साबळे, जुनेद खान, सुनिल लाखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.