सामाजिक न्याय विभागाला जागे करण्यासाठी सोमवारी बीआरएसपीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने , गायरानधारकांसह ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे – भास्करे

11

जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागाच्या अन्याय धोरणाविरोधात बी.आर.एस.पी. च्या वतीने दि. 10 एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार आहे. या निदर्शनात बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह जालना जिल्ह्यातील गायरान जमीनधारक, व एससी, एसटी, ओबीसी, विद्यार्थी यांनी बहू संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष संतोष भास्करे यांनी केले आहे.
त्या संदर्भात बीआरएसपीची बैठक जिल्हा कार्यालयात जिल्हा अध्यक्ष मिलिंद बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी अश्विनी ताई घोरपडे, किशोर बोर्डे, सत्यजित पाईकराव, सौ.विद्याताई गीते, सुनील हिवाळे, आकाश पारवे, प्रफुल्ल हिवाळे, समाधान लहाने, सुनील शिंदे, अनिल शेंडगे, ऋषिकेश गायकवाड, मोसिन पटेल, शेख शफी शेख मियाँ, निकेतन बोर्डे, विल्सन वाघमारे, सुमीत सपकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या विभागांतर्गत आवश्यक आर्थिक तरतूद व त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. मात्र धोरणात्मक बाबीच्या अक्षम्य चुका होताना दिसत आहे. शिवाय या खात्याअंतर्गत अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बार्टीतर्फे चालविण्यात येणारे उपक्रम, राज्य शासनातर्फे दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्ती, फेलोशिप, मागासवर्गीय वस्तीगृहाचे ढिसाळ नियोजन, व त्यांची सत्तेतील धनदांडग्यांना कंत्राटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारक वगैरे, अशा सर्व प्रकरणात, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय मंत्रालय, प्रशासन वारंवार अपयशी ठरले आरोप यावेळी भास्करे यांनी केला. अशा सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी, सोमवारी दि. 10 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत राज्यभर एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत. तर सांयकाळी 4 वाजता बी.आर.एस.पी.च्या शिष्टमंडळाव्दारे जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र शासनास मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येईल. *या निदर्शने कार्यक्रमाची शासनाने दखल न घेतल्यास एक महिण्यातनंतर भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मिलींद बोर्डे यांनी दिला आहे.*