स्वकर्तत्वाची जाण म्हणजे सुखाची वाटचाल शि.भ.प. संगमेश्वर महाराज वलांडीकर

10

जालना । प्रतिनिधी – चितळी पुतळी येथील 45 वा अखंड शिवनाम सप्ताह मध्ये सहाव्या दिवसाची सहावे किर्तनरुपी पुष्प गुंफताना शिभप.श्री.संगमेश्वर महाराज वलांडीकर महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शिव संतकवी लक्ष्मण महाराज यांच्या अभंगावर निरूपण करत असताना मनुष्याच्या जीवनातील सुखाचे वर्णन महाराजांनी मांडले ज्या मनुष्यांना सुख हवे आहे त्या व्यक्तींनी आपल्या जीवनातील योग्य कर्तव्याला कधीही विसरता कामा नये ,जीवनातील योग्य संगती,योग्य विचार, योग्य ज्ञान व एकत्रित कुटुंब पद्धती हे माणसाला सुख व समाधान मिळवून देते. लिंगायत धर्म संस्थापक क्रांतीसुर्य समता नायक जगतज्योती विश्वगुरू महात्मा बसवन्नाने दिलेली वचन साहित्याची शिदोरी व संत महापुरुषांच्या विचारांचा वारसा तरुणांनी जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.
कायक हाच कैलास आहे यातून एक अतिशय सुंदर अशा समाजाची निर्मिती होईल त्यातून सर्व मानव जातीला समाधान प्राप्त होईल.
पुराणातील व इतिहासातील अनेक संदर्भ देत महाराजांनी नवतरुणांना संबोधन करीत असताना तरुणांनी कर्तव्यदक्षपणे जीवन जगावे व स्वतःला वाईट संगती पासून वाईट विचारांपासून वाईट व्यसनांपासून दूर ठेवावे असे विचार महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मांडले.
यावेळी चितळी पुतळी येथील नवतरुण महात्मा बसवेश्वर मंडळाचे सर्व नवतरुण युवक व तसेच गावातील व परिसरातील भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.