रुद्राणी फाऊंडेशनच्यावतीने ‘संकल्प सेवेचा गौरव कर्तृत्वाचा’ प्रशासकीय क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणार्‍या युवक-युवतींचा सत्कार

13

टेंभुर्णी । प्रतिनिधी – रुद्राणी फाऊंडेशनच्यावतीने प्रशासकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणार्‍या युवक-युवतींचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते गणपती प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी विशेष उपस्थिती म्हणुन योगीताताई सुधाकर पा. दानवे, जिईएस ग्रुपच्या संचालिका आशाताई ज्ञानेश्वर पा. पुंगळे, राजुर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सारंगधर बापू बोडखे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रुद्राणी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले हे होते .राजुरसह परीसरात सामाजिक कार्य करणारी रुद्राणी फाऊंडेशन ही केवळ संस्था नसुन जनमानसात नाव मिळवलेलं एक व्यासपीठ आहे प्रशासकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणार्‍या युवक -युवतींचा सत्कार करण्याचे काम संस्थेने केले राजुर परिसरातील हा कार्यक्रम प्रथमच दिसला. नक्कीच रुद्राणी फाउंडेशन या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करेल असे मत जेईएस ग्रुपच्या संचालक श्रीमती आशाताई पुंगळे यांनी व्यक्त केले.यावेळी बी. एस. सय्यद, विष्णु गवळी सर यांचेसह राजूर येथील शिवा भवन येथे राजूर सह परिसरातील पोलीस खात्यात, बँकिंग क्षेत्रात,वैद्यकीय, रेल्वे अशा विविध क्षेत्रात प्रविण्य मिळवत यश गाठणार्‍या तरुण युवक व युवतींनी आपण कसे यश मिळवले याविषयी आपापले मनोगत व्यक्त केले निर्मला आणि ज्ञानेश्वर या बहीन भावांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले वडील लहानपणीच वारले तरीही आईने वडीलांची कमी भासु न देता अपार कष्ट करून आम्हाला शिकविले. आईनेही आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या मुलाने आणि मुलीने माझ्या कष्टाचं चीज केलं अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपण जिद्द, चिकाटी व परिश्रम हे गुण आपल्या अंगी असल्यास हमखास यश मिळतेच त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्या विषयात त्यांचा इंटरेस्ट आहे त्याचंच शिक्षण दिले पाहिजे. तरच युवक व विद्यार्थी यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच आजकालच्या युवकांनी राजकारण या विषयकडे जास्त लक्ष न देता अभयासपूर्ण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नापास झाल्यास किंवा आयशवी झाल्यास हार न मानता जिद्दीने परीक्षेला सामोरे जावे असे मनोगत व्यक्त केले. या सत्कार समारंभात डॉ. पूजा लोखंडे, कु. निर्मला गवळी, ज्ञानेश्वर गवळी,अनिल डवले, रवी डवले,अभिजित जामदार, रामेश्वर तळेकर या विविध क्षेत्रात यशस्वी होणार्‍या तरुण तरुणीचा भव्य गौरव करण्यात आला.या सत्काराबद्दल सर्वांनी रुद्राणी फाऊंडेशन चे आभार व्यक्त केले
अश्या पद्धतीचा उपक्रम प्रथमच रुद्रानी फॉउंडेशन राबवत असून मागील काळातही वृक्षारोपण, वही पुस्तकं वाटप, गोरगरीबांना साडी चोळी भेट, अन्नदान यासारखे बरीच उपक्रम संस्थेने केले. येणार्‍या काळातही आपण या मातीच देणे लागतो या भूमिकेतून समाजकार्य करणार असल्याच संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा दारुवाले यांनी बोलताना सांगितले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कैलास आप्पा गबाळे,तर प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग इंगळे यांनी केले यावेळी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष रामेश्वर कढवणे, चंदुमामा नागवे, सतीशअप्पा तवले,सरपंच दिनकर थोटे, ,बी. एस. सय्यद,अमोल पवार,संजय पुंगळे, दिपक घुगे,शिवाजी तायडे, संदीप मगरे, अविनाश थोटे,विष्णू मिसाळ, दिपक डवले, भरत डवले,शुभम अग्रवाल, रावसाहेब दानवे सर, ईश्वर जटाळे,निकम सर, विष्णु गवळी सर,संग्राम पाटील, पोपट सर. मुळे देवा, शंकर गुळवे, निवृत्ती पा पुंगळे, विनोद नागवे, वसंत आप्पा कोमटे, सुरेश दारुवाले, बबन शेटे ,गणेश जगताप,सदाशिव दारुवाले, आर. जी. भागीले साहेब, हिरालाल जामदार, पत्रकार साहेबराव पवार,शिवाजी बोर्डे, जगन वाघमारे,राम पुंगळे, आतमलिंग कोमटे, द्वारकाधिष पुंगळे, आशुतोष दारुवाले, अंकुश पुंगळे, रामेश्वर पुंगळे,बजरंग कोमटे, शुभम अग्रवाल, गजानन सानप , रवी हिंगमीरे, रहीम शेख, संतोष पा. पुंगळे, , संस्थेचे सदस्य भगवान पुंगळे, रवी पुंगळे, नामदेव रजाळे, ज्ञानेश्वर बोर्डे, सौ.शारदा गबाळे, नेहा अंधुरे, रुपाली दारुवाले, प्रगती इंगळे, सोनाली सांगळे, पार्वती दारुवाले, यांच्यासह मोठ्या संख्येने महीला ,तरुण ,पालक, व्यापारी नागरिक उपस्थित होतें. शेवटी राष्ट्रगीताने होऊन कार्यक्रम संपन्न झाला.