परतूर । प्रतिनिधी – परतुर तालुक्यातील सातोना बु. येथे ग्रामसभेतून अवैध दारू विक्री बंदीचा ठराव गावकर्यांच्या वतीने मांडून मंजूर करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन सरपंच मीरा गोपाळ बिडवे यांच्या उपस्थिती आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदस्या रेखा निवृत्ती बिडवे, अलका नारायण बिडवे, ग्रामसेवक विष्णू ठोके यांची उपस्थिती होती. यावेळी गावात अवैध दारू विक्री होत असल्याने गावातील वातावरण खराब होत. तरुण मुले व्यसनांच्या आहारी जात असल्याने महिला सदस्यांनी पुढाकार घेत ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव मांडला आहे. या ठरावास सूचना अलका नारायण बिडवे यांनी केले त्याला अनुमोदन सुलोचना रामकिसन बिडवे यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण बिडवे, दत्तात्रय बिडवे, दत्तात्रय घेंबड, लक्ष्मण बिडवे, गणेश बिडवे, नारायण बिडवे, दशरथ बिडवे, विठ्ठल घेंबड, निवृत्ती बिडवे, अर्जुन बिडवे, विठ्ठल बिडवे, बाबासाहेब बिडवे, कैलास बिडवे, एकनाथ घेंबड, बळीराम बिडवे, सुभाष बिडवे, रामनाथ बिडवे, महादेव बिडवे, वैजनाथ बिडवे, बालासाहेब बिडवे, श्रीकृष्ण बिडवे, किसन बिडवे, ऋषी बिडवे, काकासाहेब टोणपे यांच्यासह पुरुष व महिला ग्रामस्थांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.