प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी हरिरामजी तिवारी

36

मंठा । प्रतिनिधी – तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार हरिरामजी जगन्नाथजी तिवारी (बाबुजी) यांची प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी ही नियुक्ती कॉन्सीलचे राज्य अध्यक्ष इलियास खान व राज्य सरचिटणीस महेश जोशी यांच्या सुचनेनुसार केली आहे.
हरिरामजी तिवारी यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जी एक स्वायत्त आणि आयएसओ 9001ः2015 प्रमाणित परिषद आहे. आणि भारतीय विश्‍वस्त कायदा 1882 आणि ट्रेंड युनियन कायदा 1926 अंतर्गत नोंदणीकृत आहे. जालना जिल्हा समितीच्या निर्णयानुसार आणि राज्य अध्यक्ष व राज्य सरचिटणीस यांच्या संमतीने मंठा तालुक्यातील सदस्यांशी सल्लामसलत करून आपली जालना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे सदस्य म्हणून तुमचे स्वागत करतांना आम्हाला आनंद होत आहे. आणि आम्हाला विश्‍वास आहे की तुमचे योगदान पीसीएमची मुल्ये व उद्दिष्टे अधिक समृद्ध करण्यास मदत करेल. आम्ही आशा करतो की आपण जबाबदारी, प्रामाणिकपणे आणि सन्मानाने यशस्वी कराल. आपण पीसीएमच्या निर्देशांचे व नियमांचे पालन कराल. पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा !
हररिराम तिवारी यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे प्रेस कॉन्सील महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष इलियास खान, राज्य सरचिटणीस महेश जोशी, विजयकुमार सकलेचा, जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, जिल्हा सरचिटणीस दर्पण जैन, जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण सोळुंके, उपाध्यक्ष शेख चांद पी.जे. सय्यद रफिक, गणेश काबरा, प्रा. दत्ता देशमुख, नरेंद्र जोगड, प्रभुदास भालेराव, शेख नबी सिपोराकर, श्रीकिशन झंवर, सीताराम तुपे, प्रा. वाहेद पटेल, चेतन बजाज, शेख अशफाक, प्रभाकर प्रधान, मंठा तालुका अध्यक्ष आशिष तिवारी, मोरेश्वर बोराडे, गजानन माळकर, योगेश गणगे, शे अश्फाक, सचिन नरवाडे, रवी बोराडे, आशिष मोरे, बाळासाहेब खराबे, मुरलीधर बिडवे, सुभाष वायाळ, गणेश खराबे, जीवन काळे नवनाथ चट्टे आदी जिल्ह्याभरातील कॉन्सीलच्या पदाधिकार्‍यासह सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.