सुख हे अंतःकरणात आहे शि.भ.प.अमोल महाराज लांडगे

18

जालना । प्रतिनिधी – चितळी पुतळी येथे गेली 45 वर्षा पासून चालु असलेला गावाचा ग्रामउत्सव असलेल्या या उत्सवात आपल्या पाचव्या कीर्तनरुपी पुष्प गुंफताना महालाभहाची लाभला बा हाती, नका करु माती नरदेहाची या शिवसंत महादेवप्रभु यांच्या अभंगाच्या माध्यमातुन निरूपण करत असताना मानवी जन्म म्हणजे महालाभ आहे कारण सर्वप्राणी मात्रा पेक्षा मानवाला विचार करता येतो आणि त्याविचाराच्या बळावर आपलं जीवन आपल्याला कामधेनु करता येते म्हणजे सर्व विश्वती सुख आपल्या चरणा जवळ येते .सुख हे विश्वातल्या कोणत्याच साधनात नाही.ते तुमच्या अंतःकरणात आहे असे प्रतिपादन शि.भ.प.अमोल महाराज लांडगे यांनी केले.
पुढे या अभगाचे निरूपण करत असताना महाराज बोलत होते स्वधर्मांच आचरण करत असताना आज आपण इतरत्र बुवा बापु ढापु यांच्या मागे लागून आपल्या स्वधर्माने दिलेल आचरण विसरत चाललो आहोत मन्मथ माउलींनी कपिलधारच्या दरी खोरीत कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना जंगलातील पशु पक्षांच्या झाडांनी वेलींच्या सानिध्यात देव पदाला प्राप्त झाले. संताने आपले शरीराची म्हणजे सर्व इद्रिंयाची कृपा करुन घेतली म्हणुन तर विश्वातल्या सर्वसत्ता त्यांच्या दर्शनाला येतात .म्हणुन तर हा जन्म सोन्याचा गोळा आहे त्याचे अलंकार बनवन म्हणजे एकमेकांन प्रेमाने बोलने ऐको देव सर्वभुतेशु या वचना प्रमाणे देव सर्व विश्वात आहे .म्हणुन तर महादेव म्हणे गोड विक्षुदंड मानवी जन्मात त्रास सहन करावा लागतो .तेव्हच सुख मिळते आणि सुख हे आत्म्याचा आविष्कार आहे.तो बाहेर काढा .म्हणजे सुखी व्हाल. समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड नको त्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत तरच खर्‍या अर्थान या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून या प्रबोधनातुन सार्थक होईल असेही त्यांनी सांगितले यावेळी गायक वादक सह गावकर्‍यां सह पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते