जालना । प्रतिनिधी – येथील मुक्ता साळवे संगीत विद्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीताच्या गायन व वादन विषयाच्या परिक्षेत यशस्वी ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना नुकतेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
संगीत विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती आश्विनी वासडीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उदघाटन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मधुसूदन कांडलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा निवृत्त तहसिलदार आर.डी. खंदारे, कन्या पाठशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. करुणा नामवाड, संगीत रजनीत डॉ. प्रतिभा भद्रे, सितार वादनात पारंगत असलेल्या डॉ. जयश्री प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी आपल्या कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच विद्यालयाच्या मुलामुलींनीही आपले गायन व वादनाचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. या सर्वांना हार्मोनियमवर बि. एन. कसबे यांनी तर तबल्यावर सुनील पारीख, वैभव साखरे, हर्षल लोखंडे यांनी साद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोप करतांना सौ. एम. बी. कसबे आणि सौ. सि.जी. पैठणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यालयाच्या वाटचालीचे कौतूक केले. शेवटी उपस्थितांचे आभार बी. एन. कसबे यांनी मानले. याप्रसंगी जिंतूरवरून आवर्जुन उपस्थित राहीलेले वानखेडे विद्यालयाचे विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.