भीम फेस्टिव्हलचे थाटात उदघाटन; आनंद शिंदे यांच्या भीम गीतांनी माहोल भीममय! 

36
जालना | प्रतिनीधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या भीम फेस्टिव्हलचे काल गुरूवारी सायंकाळी थाटात उदघाटन झाले.महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी सादर केलेल्या बुद्ध- भीम गीतांनी सारा माहोल भीममय करून टाकला.
जालना शहरातील अंबड रोडवरील जांगडे मैदानावर आयोजित या भीम फेस्टिव्हलचे उदघाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते तर माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.विचारमंचावर फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष घनश्यामदास गोयल,अध्यक्ष अशोक पांगारकर,महासचिव संजय इंगळे,भीम फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष अरूण मगरे,सचिव सुनील साळवे, उपाध्यक्ष सुधाकर रत्नपारखे,जय भीम सेनेचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय नागरी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भास्कर रत्नपारखे,सचिव संतोष खरात,रविंद्र बोर्डे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने,सचिव राजेश ओ.राऊत,विरेंद्र धोका आदींची उपस्थिती होती.यावेळी उदघाटक म्हणून बोलतांना आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जालना शहरात आयोजित करण्यात आलेला हा भीम फेस्टिव्हल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारा आहे.भीम फेस्टिव्हलच्या संयोजन समितीने यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
यावेळी बोलतांना आमदार राजेश टोपे यांनी हा भीम फेस्टिव्हल म्हणजे जालनेकरांसाठी वैचारिक मेजवानी असल्याचे सांगितले. जनतेच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांची भीम गीते उर्जा निर्माण करणारी असल्याचे ते म्हणाले.  यावेळी भास्कर अंबेकर,भास्कर दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक करतांना भीम फेस्टिव्हलचे अध्यक्ष अशोक पांगारकर म्हणाले की,आपल्या महाराष्ट्राला महापुरुषांची पावनभूमी म्हणून ओळखले जाते.क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी परिवर्तनवादी चळवळ वाढीस लावून समाजिक समता प्रस्थापित केली.  महापुरुषांची पावनभूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक व वैचारिक चळवळीचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते. स्वांतत्र्य लढ्याची चळवळ तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून बळ दिले गेले.लोकशाहीरांनी त्यासाठी पोवाडे,जलसे आदी माध्यमातून समाज प्रबोधन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेत पोवाडे, वगनाट्य लावण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.लोककवी वामनदादा कर्डक यांनीही आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. निरक्षरता, गरीबी या कारणामुळे आजही अनेक कुटुंब उपेक्षित जीवन जगतांना आपण बघतो,त्यांच्या उध्दाराचा मार्ग त्यांना अजूनही सापडलेला नसल्याचे चित्र आहे.महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचारच या उपेक्षित वंचित घटकांना त्यांच्या विकासाचा व जीवन उध्दाराचा मार्ग दाखवेल, यात शंका नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचाराचा जागर व्हावा, तळागाळातील जनतेचे प्रबोधन व्हावे,या हेतूने सन 2011 पासून जालना शहरात भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे.बुद्ध व भीम गिताच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे या शुद्ध हेतूने या भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.हा भीम फेस्टिव्हल जालनेकरांसाठी वैचारिक मेजवानी असल्याचे त्यांनी सांगितले.तत्पूर्वी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून व द्वीप प्रज्वलन करून या भीम फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात आले.या उदघाटन सोहळ्याचे संचलन अरूण मगरे व संजय इंगळे यांनी केले.यावेळी राजेंद्र राख,शरद देशमुख,दिनेश फलके,राहुल हिवराळे,सगीर अहेमद,देविदास देशमुख, शिवराज जाधव,राजेश बाबरेकर,बद्रीनाथ पठाडे,अमोल कारंजेकर,अजय मिसाळ,सचिन कांबळे,कपील दहेकर,धनजंय काबलिये अमोल पाटील,राजेंद्र भारुका,संजय आटोळे,दत्तात्रय जाधव,प्रकाश आचार्य,अजय मिसाळ,अमोल कार्लेकर,सुमित सुरडकर,रवी इंगळे,शिवाजी वेताळ यांच्यासह भीम फेस्टिव्हलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.